शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोथरुड कचरा डेपोला तीन दिवसांपासून आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2018 22:15 IST

गेल्या तीन दिवसांपासून कोथरूड परिसरातील कचरा डेपोतील आग धुमसत आहे.

ठळक मुद्देशनिवारी रात्री उशीरापर्यंत ही आग विझवण्याचे काम सुरू

पुणे: गेल्या तीन दिवसांपासून कोथरूड परिसरातील कचरा डेपोतील आग धुमसत आहे.अग्निशामक विभागाच्या कर्मचा-यांचे शनिवारी रात्री उशीरापर्यंत ही आग विझवण्याचे काम सुरू होते.सुमारे साडेचार एकर परिसरात आग पसरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसात पावसामुळे झाड पडीच्या घटना घडल्या होत्या.तसेच पालिका प्रशासनातर्फे धोकादाय झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत.या झाडांच्या फांद्याचे ढीक कोथरूड कचरा डेपो परिसरात टाकण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून या फाद्यांच्या ढीगांना आग लागत आहे.अग्निशामक विभागाच्या कर्मचा-यांनी ही आग विझविली होती. मात्र, पुन्हा शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या फाद्यांना आग लागली. त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत अग्निशामक विभागाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू होते.अग्निशामक विभागाचे गजानन पाथरूडकर म्हणाले, झाड्यांच्या फाद्यांचे सुमारे 10 फुटांचे 15 ते 20 ढीग या ठिकाणी पडलेले आहेत.या ढीगांना दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. ही आग विझविण्यात आली होती. मात्र,या परिसरात मोठ्या प्रमाणावर राख साचलेली आहे. तसेच अर्ध्या जळालेल्या फांद्यांवर माती टाकून पुन्हा त्यावर पाणी टाकावे लागते. त्यामुळे आग विझविण्यास वेळ लागत आहे. मात्र,सायंकाळी सात वाजल्यानंतर ही आग अधिकच पसरल्याचे दिसून आले.पालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दुपारी व रात्री उशीरा कचरा डेपोला लागलेल्या आगीची पहाणी केली.ही जागा मेट्रो प्रकल्पासाठी असून त्या ठिकाणी सातत आग लागत आहे.अगिशामकचे विभागीय अधिकारी सुनील गिलबिले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचा-यांकडून आग विझविण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दलkothrudकोथरूड