कॉफी मशीनमुळे आग

By Admin | Updated: April 1, 2017 02:36 IST2017-04-01T02:36:16+5:302017-04-01T02:36:16+5:30

कॉफी मशीनला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये गंगाधाम चौकातील मॉलमधील खासगी क्लास रुम संपूर्णपणे

Fire due to a coffee machine | कॉफी मशीनमुळे आग

कॉफी मशीनमुळे आग

पुणे : कॉफी मशीनला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये गंगाधाम चौकातील मॉलमधील खासगी क्लास रुम संपूर्णपणे जळाली. या आगीमध्ये शैक्षणिक साहित्य, फर्निचर आणि अन्य साहित्य जळून खाक झाले. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने खाली आणल्यामुळे कोणीही जखमी झाले नाही.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी पावणेबाराच्या सुमारास गंगाधाम चौकातील एका इमारतीमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, कोंढवा आणि मुख्य अग्निशामक दलाचे जवान बंबासह घटनास्थळी धावले. त्या वेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागलेली होती. पाण्याचा मारा करून तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
दरम्यान, इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणावर धूर कोंडलेला होता. वरच्या मजल्यावरील सर्व नागरिकांना तातडीने बाहेर काढण्यात आले. पहिल्या मजल्यावर एक खासगी क्लास आहे. या क्लासमध्ये विद्यार्थी असतानाच आग लागली होती. तातडीने सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Fire due to a coffee machine