तपनेश्वर मंदिराजवळील पिंपळाच्या झाडाला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:48+5:302021-03-09T04:12:48+5:30
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार: रविवारी रात्री नऊच्या सुमारास तपनेश्वर मंदिरालगत असलेल्या सव्वाशे वर्षे जुन्या पिंपळाच्या झाडाने अचानक पेट घेतला.पहाता पहाता ...

तपनेश्वर मंदिराजवळील पिंपळाच्या झाडाला लागली आग
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार: रविवारी रात्री नऊच्या सुमारास तपनेश्वर मंदिरालगत असलेल्या सव्वाशे वर्षे जुन्या पिंपळाच्या झाडाने अचानक पेट घेतला.पहाता पहाता खोडापासून झाडाच्या टोकापर्यंत आगीचे लोळ दिसू लागले.नागरिकांनी तत्परता दाखवत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यापूर्वी सरपंच किरण राजगुरू, माजी सरपंच दत्ता गांजाळे,ग्रामपंचायत सदस्य सतीश बाणखेले,राजू थोरात,जे.के.थोरात,जालिंदर बिबवे,दत्ता मोरडे व ग्रामस्थांनी आग विझविण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. आग वाढत असल्याचे पाहून अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. साधारणपणे रात्री दहाच्या सुमारास राजगुरुनगर येथून अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर दोन तासात संपूर्ण आग विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले. मात्र जुना ठेवा नष्ट झाल्याचे वृक्षमित्र यांनी सांगितले. आगीमुळे या झाडाचे मोठे नुकसान झाले आहे.
०८ मंचर झाड आग