शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दुकाने जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:12 IST2021-03-27T04:12:45+5:302021-03-27T04:12:45+5:30

पुणे : खराडी बायपास रस्त्यावरील राघोबा पाटीलनगर येथील राघोबा पाटील चौकातील एका इमारतीला आग लागल्याने सुमारे पाच दुकाने ...

A fire broke out due to a short circuit | शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दुकाने जळून खाक

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने दुकाने जळून खाक

पुणे : खराडी बायपास रस्त्यावरील राघोबा पाटीलनगर येथील राघोबा पाटील चौकातील एका इमारतीला आग लागल्याने सुमारे पाच दुकाने आणि पहिला मजला जाळून खाक झाला.

ही घटना शुक्रवारी (२६) रात्री ८:३० वाजता घडली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग एका गादीच्या दुकानाला लागली. त्यामुळे आगीने पेट घेतला. आगीच्या ज्वाळा मोठ्या प्रमाणात निघू लागल्या. यात पाच दुकाने आणि पहिल्या मजल्यावरील डायग्नोस्टिक लॅब जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग मोठी असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. इमारत रस्त्याला लागून असल्याने वाहतूककोंडी झाली होती. माहिती कळताच पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ, किरण आवटे, पोलीस कर्मचारी राहुल सोनकांबळे, राजाभाऊ तांबडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तत्काळ अग्निशमन दलाच्या चार मोठ्या गाड्या, एक देवदूत, घटनास्थळी दाखल झाले. आग विझविण्यासाठी १५ ते २० मिनिटे वेळ लागला, असे दलाचे स्टेशन अधिकारी विजय भिलारे, शंकर चव्हाण यांनी सांगितले.

इमारतीच्या समोरील गाड्या काढताना शुभम वाघमारे यांचा हात भाजला. सागर गिरमे, मनोज माने, सतीश वाघमारे, अजर सय्यद, सौरभ जाधव, सिद्धार्थ रणीत यांनी गर्दी कमी करण्यासाठी मदत केली.

Web Title: A fire broke out due to a short circuit