VIDEO- अन् ‘त्याने’ पंख फडफडवताच झाला टाळ्यांचा गजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2018 20:52 IST2018-03-31T20:52:45+5:302018-03-31T20:52:45+5:30

VIDEO- अन् ‘त्याने’ पंख फडफडवताच झाला टाळ्यांचा गजर
पुणे : हनुमान जयंतीनिमित्त गोखलेनगरमधील हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होती. मंदिराशेजारीच एक मोठे उंबराचे झाड आहे. या झाडावर दुपारपासून एका पोपटाचा आवाज येत होता. तेव्हा लोकांनी निरखून पाहिल्यावर अगदी उंचावर त्याच्या पायात पतंगीचा मांजा अडकलेला दिसून आला. अग्निशामक दलाच्या जवानांनी सुमारे ६० ते ७० फुटावर असलेल्या या पोपटाला एक्सटेशन लॅडरचा वापर करुन हुकाच्या सहाय्याने खाली घेतले. मांजातून पाय काहीसा मोकळा होताच तो इतक्यावेळ निपचित पडून असलेल्या पोपटाने पंख फडफविण्यास सुरुवात करुन सुटकेसाठी धडपड करुन लागला़ अग्निशमन जवानांनी हळूच तो मांजा पायातून वेगळा करण्यासाठी हुक फिरविला. त्याबरोबर त्याच्या पायातून मांजा निघताच त्याने आकाश भरारी घेतली. त्याबरोबर जमलेल्या लोकांनी टाळ्यांचा एकच गजर केला.
हनुमान जयंती साजरी करत असताना मंदिराजवळच पोपट असा अडकून पडल्याने आम्हाला काही सुचत नव्हते, असे म्हणून लोकांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले़ फायरमन राजेंद्र भिलारे, कैलास पवार, सचिन गवळी, चालक जगताप यांनी ही कामगिरी केली.