पुणे - पुण्यातील हडपसर परिसरात मध्यरात्री भीषण आग लागून 19 मजूर कुटुंबांची पत्रा-बांबूच्या शेडची घरे पूर्णपणे जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची घटना घडलेली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. घटना कशी घडली?ही आग लोहिया गार्डन शेजारील मगरपट्टा चौकाजवळील भोरी पडळ भागात रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास लागली. स्थानिकांच्या माहितीनुसार काही अज्ञात मुलांनी मोटरसायकल पेटवली. पेटलेल्या दुचाकीचा स्फोट झाल्यानंतर शेजारील पत्र्याच्या झोपड्यांना आग लागून भीषण दुर्घटना घडली. घरातील लोकांना आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून सर्वांना बाहेर काढले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
Video : हडपसरमध्ये मध्यरात्री आग;19 मजूर कुटुंबांची घरे जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:22 IST