शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

Pune | पिरंगुटमध्ये सुजानिल केमो कंपनीमध्ये आगीचे तांडव; बॅरलमधील केमिकलला लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 20:48 IST

बॅरलमधील असलेल्या केमिकलला उन्हामुळे आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे

पिरंगुट (पुणे) : पिरंगुट औद्योगिक वसाहतीमधील सुजानील केमो इंडस्ट्रीज कंपनीमध्ये भीषण आग लागली. सुदैवाने गेले दोन ते अडीच वर्षांपासून ही कंपनी बंद असल्याने या आगीमध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पिरंगुट (लवळे फाटा) येथे आशिष देसाई व हिरण देसाई यांच्या मालकीची सुजानिल केमो  इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये शेतीवरील किटकनाशके फवारण्यासाठी लागणाऱ्या औषधाची निर्मिती केली जात होती. परंतु गेले दोन ते अडीच वर्ष झालं ही कंपनी बंद असून या कंपनीमध्ये केमिकल तयार करण्यासाठी लागणारे रॉ मटेरियल मात्र स्टोअर करून ठेवण्यात आलेले आहे. तेव्हा त्यातील काही बॅरल हे कंपनीच्या थोडे बाहेर होते. तेंव्हा त्या बॅरलमधील असलेल्या केमिकलला उन्हामुळे आग लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  ही आग लागल्यानंतर थोड्याच वेळात या आगीने मोठे रुद्र रूप धारण केले होते. हवेमध्ये काळ्या धुराचे लोट उडताना दिसत होता. या आगीमध्ये मोठमोठ्या स्फोटांचे आवाज देखील येत होते. तेव्हा या संपूर्ण घटनेची माहिती पौड पोलीस स्टेशनला देण्यात आली. तेव्हा तत्काळ पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व ग्रामस्थांनी लागलीच अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत महावितरणचे बनकर व त्यांच्या सहकार्याने विद्युत पुरवठा खंडित केला.

पोलिसांनी व स्थानिकांनी आग लागलेल्या कंपनीच्या आजूबाजूच्या परिसरात राहत असलेल्या मानव वस्तीमधील रहिवाशांना स्वसंरक्षणासाठी आपली घरे सोडून बाजूला जाण्यास सांगितले. दुर्घटनेनंतर वीस ते पंचवीस मिनिटांच्या कालावधीमध्ये पीएमआरडीए मारुंजी येथील अग्निशामक दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व जवळपास एक ते दीड तासाच्या अथक परिसरानंतर त्यांनी ही संपूर्ण आग आटोक्यात आणली.

ही संपूर्ण आग विझविण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गायकवाड, नितीन गार्डी, चंद्रकांत नवणे, निवास जगदाळे, महादेव गोळे, किरण गोळे, रमेश पवळे, राजाभाऊ वाघ,ओजस पाटील, सचिन पवळे, मनोज पवळे, वैभव पवळे, गणेश बलकवडे, दत्तात्रय आहेर, गौरव गोळे, रामदास गोळे, अंकुश नलावडे, गणेश पवळे, सौरभ पवळे, विशाल धोत्रे, नवनाथ पवळे, गणेश गोळे, विकास पवळे, किरण देव, रामदास पवळे,अनुराग पवळे  व इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.

टॅग्स :Puneपुणेfireआगfire brigade puneपुणे अग्निशामक दल