फायर ऑडिट पॉलिसी ही अंमलात यायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:40+5:302021-06-09T04:14:40+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने फायर ऑडिट संदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासंदर्भात अजून निर्णय झाला ...

The fire audit policy should be implemented | फायर ऑडिट पॉलिसी ही अंमलात यायला हवी

फायर ऑडिट पॉलिसी ही अंमलात यायला हवी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : औद्योगिक सुरक्षेच्या दृष्टीने फायर ऑडिट संदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता. यासंदर्भात अजून निर्णय झाला नाही. मात्र, एका रात्रीत या गोष्टी होत नाही. याबाबत सर्वांना विचारात घेणे गरजेचे असते. गेल्या वेळी रुग्णालयाला जेव्हा आग लागली होती. तेव्हा यासंदर्भात मागणी केली होती. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलणे झाले आहे. ती फाईल पूर्ण व्हायला तसेच त्याची पॉलिसी बनवून अंमलबजावणी करायला आणखी दोन ते तीन महिने लागतील, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

उरवडे येथील कंपनीला त्यांनी भेट देत पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, उद्योग असो दवाखाने असो किंवा नागरी जागा असो त्या ठिकाणी आगीपासून सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र फोर्स, तसेच पायाभूत सुविधा असाव्या असे माझे मत आहे. यासंदर्भात आज जे कायदे आहे त्यांचे आणखी बळकटीकरण होणे गरजेचे आहे. अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंमलबजावणी पाहिजे त्याप्रमाणात होत नाही आहे. सातत्याने घटना घटल्यावरच यावर चर्चा करण्यापेक्षा ठोस पावले उचलण्याची गरज आहे. यामुळे यासंदर्भात मी जी पॉलिसी बनवण्याची मागणी करत आहे ती जर झाली तर बरेच प्रश्न सुटतील, असे वाटत असल्याचे सुळे म्हणाल्या.

फोटो आहे

Web Title: The fire audit policy should be implemented