शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

युवकाला गंभीर आजार हाेण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी हाॅस्पिटलवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 22:12 IST

वेदना कमी होण्यासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे गंभीर आजार होऊन त्यामुळे झालेल्या वेदना तसेच मानसिक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी खराडी येथील कोलंबिया एशिया रुग्णालयाच्या दोन डाँक्टर व ब्रदरसह रुग्णालय प्रशासनावर चंदननगर पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला.

विमाननगर : वेदना कमी होण्यासाठी दिलेल्या इंजेक्शनमुळे गंभीर आजार होऊन त्यामुळे  झालेल्या वेदना तसेच मानसिक व आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी खराडी येथील कोलंबिया एशिया रुग्णालयाच्या दोन डाँक्टर व ब्रदरसह रुग्णालय प्रशासनावर चंदननगर पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी करणजितसिंग भट्टि( वय २७,रा.महालक्ष्मी विहार,विश्रांतवाडी) याने तक्रार दाखल केली आहे.

पोलिस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, करणजितसिंग हा विमाननगर येथील बीपीओ कंपनीतील काम करत होता.१२ जुलै २०१८ रोजी आँफिसमध्ये पायरीवरुन घसरुन पडल्यामुळे त्याच्या पाठिला व कंबरेला इजा झाली होती. आँफिसमधील सहकाऱ्यांनी त्याला उपचारासाठी खराडी येथील कोलंबिया एशिया हाँस्पिटल येथे आणले. याठिकाणी हजर असणाऱ्या डाॅ.सुवर्णा भाले व डाॅ.अझर लखानी यांनी करणजितच्या वेदना कमी होण्यासाठी मदतनीस ब्रदर एपरापटनान कहाय याला एक इंजेक्शन देण्यास सांगितले. करणजितला इंजेक्शन दिल्यानंतर डाँक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्या. त्यानंतर करणजितचे पालक त्याला घेऊन घरी गेले. दोन दिवसांनंतर करणजित याला इंजेक्शनमुळे कमरेला मोठी गाठ येऊन प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यामध्ये इंनफेक्शन होऊन गंभीर आजार झाला. त्याच्या पालकांनी त्यावर एका खाजगी रुग्णालयात तीन महिने उपचार केले.त्यासाठीं सुमारे दिड लाख रुपये खर्च झाला. यासर्व प्रकरणात करणजितची नोकरी देखिल गेली.

या गंभीर प्रकरणी करणजितच्या पालकांनी चंदननगर पोलिसांकडे दोषींवर कायदेशीर कारवाईसाठी ३१ जुलै २०१८रोजी तक्रार अर्ज केला होता. चंदननगर पोलिसांनी याबाबत ससून रुग्णालयाच्या तज्ञ समिती कडून अहवाल मागवला होता. ७ डिसेंबर २०१८ रोजी ससून रुग्णालयाच्या समितीने इंजेक्शनमुळे गंभीर आजार झाल्याचा स्पष्ट अहवाल दिला. त्यानुसार कोलंबिया एशिया हाँस्पिटचे इंजेक्शन देण्याच्या सूचना देणारे दोन डाँक्टर सह इंजेक्शन देणार्‍या ब्रदर व या सर्व गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करणार्‍या रुग्णालय प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रघुनाथ सोडनवार करीत आहेत.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलPuneपुणे