शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मतदान करणाऱ्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 21:48 IST

पुणे शहरात विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या असून बिबवेवाडी परिसरात असलेल्या बुथ क्रमांक २८७ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पुणे : पुणे शहरात विविध मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या असून बिबवेवाडी परिसरात असलेल्या बुथ क्रमांक २८७ वर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पतीपत्नीच्या अगोदरच सकाळी आठ वाजण्यापूर्वीच कोणीतरी मतदान करुन गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात दोघा अनोळखीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दिनेश भुवनेंद्र अगरवाल (वय ४७, रा़ गंगाधाम सोसायटी, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल व त्यांच्या पत्नी राधा यांचे मतदान बिबवेवाडीतील पंचदीप भवन येथे होते. ते आपल्या पत्नीसह सकाळी ८ वाजताच मतदान करण्यास पोहचले. तेव्हा तेथील मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांना दोघा पतीपत्नींच्या नावावर अगोदरच कोणीतरी मतदान करुन गेले असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील प्रिसायडिंग अधिकारी पंडित यांची भेट घेतली. त्यांनी पडताळणी केली तेव्हा त्यांनीही दुसऱ्याच कोणी तरी मतदान करुन गेल्याचे मान्य केले. त्यानंतर त्यांना टेंडर मतदान करु देण्यात आले. त्यानंतर त्यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीpune-pcपुणे