शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ट्विटरवरून बदनामीकारक मजकूर पाठवल्याने आमदार जिग्नेश मेवानी विरोधात गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:57 IST

मेवानी यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व अन्य दोन साधू यांच्या फोटोबरोबर शेफाली वैद्य यांचे फोटो क्रॉप करून जोडले व ते ट्विटरवर टाकले होते.

ठळक मुद्देसोशल मीडिया कायद्यातंर्गत जिग्नेश मेवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पौड : पत्रकार व सोशल मीडियाच्या प्रसिद्ध लेखिका शेफाली वैद्य यांच्याबाबत चुकीचा मजकूर व फोटो प्रसिद्ध करून बदनामी केल्याप्रकरणी गुजरात विधानसभेचे आमदार जिग्नेश मेवानी व त्यांच्या साथीदाराविरोधात शेफाली वैद्य यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेवानी यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व अन्य दोन साधू यांच्या फोटोबरोबर शेफाली वैद्य यांचे फोटो क्रॉप करून जोडले व ते ट्विटरवर टाकले होते. या बदनामी प्रकरणी वैद्य यांनी पौड पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. शेफाली वैद्य या पुणे शहरानजीक असलेल्या भुगाव येथे वास्तव्यास असल्याने त्यांनी पौड ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पौड पोलिसांनी सोशल मीडिया कायद्यातंर्गत जिग्नेश मेवानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर प्रकरणाचा तपासात पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या मार्गदर्शनाखाली पौडचे अतिरिक्त पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे करत आहेत.

टॅग्स :PaudपौडCrimeगुन्हाSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटरJignesh Mevaniजिग्नेश मेवानी