माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर गुन्हा ; पैशांचा अपहार केल्याचा आराेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 04:50 PM2020-01-19T16:50:04+5:302020-01-19T16:51:14+5:30

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर पैशाचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR against malegaon sugar factory chief | माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर गुन्हा ; पैशांचा अपहार केल्याचा आराेप

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षांवर गुन्हा ; पैशांचा अपहार केल्याचा आराेप

Next

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखाना व शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे अध्यक्ष रंजनकुमार शंकरराव तावरे यांनी पतसंस्थेचे सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांच्या संगनमताने ५१ लाख ३० हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याचा गुन्हा बारामती तालुका पोलिसांनी दाखल केला आहे.
याप्रकरणी बारामती पोलिस ठाण्यात माळेगाव कारखान्याचे संचालक व पतसंस्थेचे सभासद सुरेश तुकाराम खलाटे यांनी रंजनकुमार तावरे व पतसंस्थेचे सचिव नंदकुमार कृष्णांजी खैरे यांच्याविरुद्ध शनिवारी (१८) रोजी उशिरा पोलिसात फिर्याद दिली. 

दिलेल्या फिर्यादीनुसार २०११ मध्ये शरद ग्रामीण बिगरशेती  पतसंस्थेचे अध्यक्ष व सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांनी संगनमत करून माझ्यासह रामदास आटोळे (खांडज), राजेंद्र तुकाराम बुरुंगले (माळेगाव बुद्रुक) आम्हा तिघांच्या कर्जमागणी प्रकरणी कोऱ्या धनादेशावर सह्या घेतल्या. त्यानुसार आमच्या नावे प्रत्येकी १७ लाख १० हजार रुपये असे एकूण ५१ लाख ३० हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे दाखवले. तसेच सदर रक्कम रोखड (बेअरर) चेक द्वारे आमच्या परस्पर काढून घेतली, असल्याचे सुरेश तुकाराम खलाटे यांनी फियार्दीत नमूद केली आहे. त्यामुळे पोलिसांनी फियार्दीनुसार व सहाय्यक निबंधक चौकशी अहवालाच्या आधारे पोलिसांनी शरद ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेचे अध्यक्ष रंजनकुमार शंकरराव तावरे व सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे विरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, रकमेचा अपहार करणे, विश्वास घात करणे आणि महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: FIR against malegaon sugar factory chief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.