शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अग्रीम रकमेचा तपशील मिळेना

By admin | Updated: March 22, 2017 03:31 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातर्फे

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातर्फे अग्रीम रक्कम दिली जाते. मात्र, खर्च केलेल्या रकमेचा तपशील देण्यास महाविद्यालयांकडून टाळाटाळ केली जाते. २ ते ३ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही महाविद्यालयांनी विद्यापीठाला खर्चाचा हिशेब दिलेला नाही. त्यामुळे संबंधित महाविद्यालयांच्या खर्चात कपात करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक या तीन जिल्ह्यांमधील महाविद्यालयांना विविध विद्याशाखांच्या परीक्षांसाठी वित्त व लेखा विभागातर्फे तब्बल ३५ कोटी रुपयांचे वितरण केले जाते. वर्षातून दोन वेळा परीक्षा घेतल्या जात असल्याने विद्यापीठाकडून मुख्य परीक्षेस २0 कोटी आणि पुरवणी परीक्षेस १५ कोटी अशा ३५ कोटी रुपयांचे वितरण केले जाते. परीक्षेसाठी लागणारे मन्युष्यबळ व इतर व्यवस्थेसाठी महाविद्यालय प्रशासनाकडून आवश्यक खर्च केला जातो. त्याचा तपशील सहा महिन्यांच्या आत विद्यापीठाला सादर करणे बंधनकारक आहे. परंतु, पुण्यासह अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला तरी अद्याप खर्चाचा हिशेब दिलेला नाही. वेळचे वेळी हिशेब दिला जात नसल्याने दरवर्षी विद्यापीठाच्या लेखा परीक्षण अहवालात ७ ते ९ कोटींची रुपयांची तफावत दिसून येते, असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)