जळीतग्रस्तांना आर्थिक मदत करावी : मिलिंद कांबळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:12 IST2021-04-01T04:12:14+5:302021-04-01T04:12:14+5:30
पुणे : फॅशन स्ट्रीटवरील सर्व जळीतग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड ...

जळीतग्रस्तांना आर्थिक मदत करावी : मिलिंद कांबळे
पुणे : फॅशन स्ट्रीटवरील सर्व जळीतग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (डिक्की) संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी केली.
कांबळे यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह आग लागलेल्या ठिकाणी भेट दिली. जळीतग्रस्तांची विचारपूस केली. जिल्हाधिकारी तसेच अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अद्याप घटनास्थळाला भेट दिली नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अविनाश जगताप, अनिल होवाळे, एन. जी. खरात, मैत्रिय कांबळे, प्राजक्ता गायकवाड, अमित अवचरे यासह दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : फँशन स्ट्रीट येथील जळीतग्रस्त भागाची पाहणी करून काही दुकानचालकांबरोबर डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी चर्चा केली.
(फोटो - फॅशन स्ट्रीट मिलिंद कांबळे व्हिजीट नावाने आहे)