शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सीबीएसईच्या काही शाळांना शासन निर्णय मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 17:06 IST

या शाळांनी ५ जूनऐवजी ११ व १६ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला

- दीपक होमकर पुणे : सीबीएसईशी संलग्न शाळांनी उन्हाळ्याच्या सुट्या संपवून शाळा सुरू करण्याचा दिवस त्यांच्या सोयीने ठरविला आहे. त्यामुळे एकाच परिसरातील शाळा सुरू करण्याच्या तारखा वेगवेगळ्या झाल्या आहेत. या मनमानी कारभाराबद्दल ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर काही शाळांनी त्यांचा निर्णय बदलला असून, राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार १६ जून रोजी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा मेसेजही शाळेने पालकांच्या अधिकृत व्हाॅट्सॲप ग्रुपवर टाकला आहे.

राज्यातील सर्व शाळा १६ जून रोजी सुरू करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला होता. त्यानुसार एसएससी पॅटर्नच्या शाळांनी १६ जून रोजी शाळा सुरू करण्याची तयारी केली. मात्र, दुसरीकडे सीबीएसई संलग्न शाळांनी राज्य शासनाच्या आदेशाला बासनात गुंडाळले असून, त्यांच्या सोयीनुसार शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि २ जूनपासून ते २१ जूनपर्यंत विविध तारखांना शाळा सुरू करण्याची सूचना पालकांना दिली आहे. सीबीएसईचे पॅटर्ननुसार शाळा सुरू करणार असल्याचे कारण या शाळांनी सांगितले असले तरी ‘सीबीएसई’ तरी शाळांना वेगवेगळ्या तारखा दिलेल्या नाहीत. केंद्रीय विद्यालयांना मात्र २१ जून रोजी शाळा सुरू करण्याच्या सूचना असल्याने पुण्यातील सर्व केंद्रीय विद्यालये २१ जून रोजी सुरू होणार आहेत. केंद्रीय विद्यालयांना शाळा २१ जून रोजी सुरू करण्याच्या सूचना असेल तर सीबीएसई संलग्न एकाच शहरातील शाळांना २ जून, ५ जून, ११ जून, ९ जून, ११ जून अशा विविध तारखा कशा काय दिल्या गेल्या हाच प्रश्न आहे. त्यामुळे सीबीएसई संलग्न शाळांकडून पालकांची आणि राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाची फसवणूक होत असल्याचे स्पष्ट होते.

शिक्षण उपसंचालक अन् शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का?

सीबीएसई संलग्न शाळा असल्या तरी शाळांची मान्यता, शिक्षकांची मान्यता, अपार आयडी, शालार्थ आयडी या साऱ्या बाबी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्याकडून पूर्ण कराव्या लागतात. या शाळाच्या मान्यता देण्याचे व मान्यता रद्द करण्याचे अधिकारही शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांना आहेत. तरीदेखील शिक्षण विभागाकडून या शाळांचे शुल्क, एनसीईआरटी व्यतिरिक्तची अवास्तव महागडी पुस्तके याकडे सोयीने दुर्लक्ष होत आहे, त्याबाबत पालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

शासन निर्णय मान्य करणाऱ्या शाळांची नावे अशी

एसव्ही युनियन हायस्कूल, सोमवार पेठ,ग्रीनवूडस् स्कूल, हडपसर

चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र