शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो कारशेडचा प्रश्नमार्गी; जिल्ह्यात भूसंपादनाचा 'देशमुख पॅटर्न'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 21:48 IST

दर आठवड्याच्या आढावा बैठकीचा परिणाम: डाॅ.राजेश देशमुख

पुणे : गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेला हिंजवडी ते  शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे माण येथील कारशेडचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख याच्या मार्गदर्शनाखाली मावळ प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी गुरुवार (दि.1) रोजी तब्बल 60150 चौमी क्षेत्राचा पीएमआरडीए व महामेट्रो यांचे उपस्थित अधिका-यांना दिला. सदर प्रक्रिया हिंजवडी पोलीसस्टेशन यांचेकडील बंदोबस्तात शांततेत पार पडली.

पीएमआरडीए’कडून सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) या तत्त्वावर हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी टाटा-सिमेन्स यांच्यासोबत करार झाला असून, करारानुसार ’पीएमआरडीए’ने या प्रकल्पासाठी आवश्यक जागा टाटा-सिमेन्सला ताब्यात देणे आवश्यक होते. माण येथील कारशेडच्या जागेबाबत विरोध असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया रखडली होती. आता हा अडथळा दूर झाला असल्याचे संदेश शिर्के यांनी सांगितले.  या मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडची जागा 2004 मध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळासाठी (एमआयडीसी) आरक्षित करण्यात आली होती. हे आरक्षण बदलून संबंधित जागा मेट्रो प्रकल्पासाठी देण्याची कागदोपत्री प्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे भूसंपादनातील अडचणी दूर झाल्या आहेत. या जागेबाबत प्रकल्पग्रस्तांना द्यावयाच्या परताव्याची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या जागांपैकी यशदा आणि वाडिया महाविद्याालयांच्या आवश्यक जागांचा ताबाही घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या जागांसाठी पाठपुरावा सुरू आहे.----जिल्ह्यात भूसंपादनाचा "देशमुख पॅटर्न "     पुणे जिल्ह्यातील अनेक महत्त्वाचे प्रकल्प केवळ भूसंपादन वेळेवर होत नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. परंतु पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून डाॅ.राजेश देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील रखडलेले विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला. पुण्याचा रिंगरोड, मेट्रो, राष्ट्रीय महामार्गाची रखडलेली कामे असो की पालखी मार्ग, चांदणी चौकातील ब्रीज, नवले ब्रीज परिसरातील रस्ता,  या ठिकाणी असलेले भूसंपादनाचे प्रश्नमार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी गेल्या सहाच महिन्यात प्रचंड गती दिली. देशमुख दर आठवड्याला संबंधित सर्व भूसंपादन अधिकारी व प्रकल्पांचे अधिकारी यांची आढावा बैठक घेतात. या बैठकीत एका आठवड्यात झालेली कामाची प्रगती,  काही अडचण असल्यास ती कशी दूर करता येईल यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढला जातो. यामुळेच सध्या पुण्यात भूसंपादनचा जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांचा " देशमुख पॅटर्न " ची चांगलीच चर्चा आहे.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोcollectorजिल्हाधिकारीAjit Pawarअजित पवार