शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ऑनलाईन पीयुसीवर शिक्कामोर्तब : परिवहन विभागाचे परिपत्रक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 20:25 IST

अधिकाऱ्यांमधील या गोंधळाच्या स्थितीमुळे वाहनचालक व पीयुसी सेंटरचालकांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देमंगळवारपासून अंमलबजावणीला सुरूवात

पुणे : जुन्या पध्दतीने पीयुसी प्रमाणपत्रावर फुली मारून परिवहन विभागाने ऑनलाईन प्रमाणपत्रावर मंगळवारी (दि. २४) शिक्कामोर्तब केले. विभागाकडून कोणताही आदेश नसल्याने मागील आठवड्यापासून संभ्रमावस्थेत असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाला याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार ऑनलाईन प्रमाणपत्राची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील कारचे राज्यातील पीयुसी सेंटरवरून बोगस प्रमाणपत्र मिळाल्याचे ' लोकमत 'ने उजेडात आणल्यानंतर परिवहन विभाग खडबडून जागा झाला. त्यानंतर लगेचच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी राज्यात ऑनलाईन पीयुसीची घोषणा केली होती. पण परिवहन विभागाकडून याबाबत कोणतेही अधिकृत आदेश नव्हते. त्यामुळे अधिकायांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. पीयुसी सेंटरच्या परवान्याची मुदत असेपर्यंतच त्यांना जुन्या पध्दतीने पीयुसी प्रमाणपत्र देता येईल. तसेच अशा सेंटरला भविष्यात मान्यता मिळणार नाही, असे काही अधिकारी सांगत होते. तर मागील आठवड्यात शुक्रवार (दि. २०) पासून केवळ ऑनलाईन पीयुसी प्रमाणपत्र मिळणार असल्याचे सांगितले होते. अधिकाऱ्यांमधील या गोंधळाच्या स्थितीमुळे वाहनचालक व पीयुसी सेंटरचालकांमध्येही संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. काही सेंटरचालकांनी जुने प्रमाणपत्र देणे सुरू ठेवले होते. तर काहींनी बंद केल्याचे दिसून आले.अखेर मंगळवारी परिवहन विभागाने जुन्या पध्दतीचे पीयुसी प्रमाणपत्र देणे बंद करणार असल्याचे जाहीर केले. विभागाकडून तसे आदेश राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना दिले आहेत. सहायक प्रादेशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल पीयुसी सेंटर ओनर्स असोसिएशनची पीयुसी सेंटर संगणकीकरणाबाबत कालावधी वाढून देण्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे परिवहन विभागाने मंगळवारपासून संगणकीकृत पीयुसी देण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे सर्व पीयुसी सेंटर संगणकीकृत करणे अनिवार्य आहे. त्यामुळे यापुढे संगणकीकरण केल्याशिवाय संबंधित चालकांना प्रमाणपत्र देता येणार नाही. मंगळवारपासून जुन्या पध्दतीने पीयुसी दिले जाणार नाही. तसे आढळून आल्यास सेंटर चालकांवर गुन्हा दाखल करून मान्यता रद्द केली जाईल. वाहनचालकांनी यापुढे केवळ ऑनलाईन पध्दतीनेच पीयुसी प्रमाणपत्र काढावे, असे आवाहन सांगोलकर यांनी केले. दरम्यान, मंगळवारपुर्वी जुन्या पध्दतीने काढलेल्या पीयुसी प्रमाणपत्राची मुदत संपेपर्यंत ती ग्राह्य धरली जातील. मात्र यापुढे केवळ ऑनलाईन पीयुसीलाच मान्यता असणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेonlineऑनलाइनDiwakar Raoteदिवाकर रावतेNitin Gadkariनितीन गडकरीRto officeआरटीओ ऑफीस