शहरं
Join us  
Trending Stories
1
टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत
2
"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
3
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
4
मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स इंडस्ट्रीज 'या' राज्यात करणार ₹7 लाख कोटींची गुंतवणूक
5
IND vs NZ ODI : वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेतून OUT! ‘या’ युवा खेळाडूला टीम इंडियात पहिली संधी
6
Holiday Election: राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी
7
व्हेनेझुएलाचा 'गुप्त' खजिना! कच्चे तेल किंवा सोने नाही तर 'या' वस्तूवर अमेरिकेचा डोळा?
8
"रोज रशियाचे 1000 सैनिक मारले जात आहेत, हा निव्वळ 'वेडेपणा', अमेरिका..."; झेलेंस्की यांचा धक्कादायक दावा
9
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
10
केवळ 'बजेट' महत्त्वाचे नाही! 'अर्थविधेयक' ठरवते महागाई, टॅक्स अन् बरच काही; बारकावे समजून घ्या
11
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
12
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
13
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
14
Makar Sankrant 2026: संक्रांत साजरी करता, पण आदला आणि नंतरचा दिवस का महत्त्वाचा माहितीय?
15
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
16
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
17
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
18
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
19
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
20
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! बारामतीच्या 'मॅरेथॉनपटु'लता करे यांच्या पतीचं कोरोनाने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 16:52 IST

२०१३ मध्ये त्या पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत अनवाणी पायाने धावल्या....

प्रशांत ननवरे-  बारामती: बारामती येथील ७२ वर्षीय मॅरेथॉनपटु लता करे यांचे पती भगवान करे यांचे बुधवारी(दि ५) कोरोनाने निधन झाले. २०१३ मध्ये बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत धावत लता करे यांनी पहिल्यांदा पतीच्या हृदयविकारावरील उपचारासाठी अनवाणी धावत प्रथम क्रमांक मिळविला होता.त्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. येथील रुग्णालयात कोरोनाचे उपचार सुरु  असताना अखेर मंगळवारी (दि.४) रात्री त्यांच्या पतीचे निधन झाले.त्यामुळे पतीला वाचविण्यासाठीची करे यांची धाव आता कायमची थांबली आहे.

लता करे यांचे पती महिला हॉस्पीटल कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होते. मंगळवारी (दि ४) दुपारी राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षा  अनिता गायकवाड हॉस्पिटलकडे जात असताना त्यांना लता करे रस्त्याने जाताना दिसल्या.त्या फार अस्वस्थ वाटल्याने गायकवाड यांनी करे यांची विचारपूस केली.यावेळी करे यांनी,माझे पती अ‍ॅडमिट आहेत त्यांना औषधोपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले.यानंतर गायकवाड यांनी त्यांना औषधे घेवुन दिली. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचे मंगळवारी रात्री निधन झाले.

२०१३ मध्ये त्या प्रथम पतीच्या हृदयविकारावरील उपचाराचे पैसे मिळविण्यासाठी मॅरेथॉनमध्ये कडाक्याच्या थंडीत  अनवाणी धावल्या.पतीच्या उपचारासाठी वयाच्या ६४ व्या वर्षी धावणाºया लता यांची त्यांनी मिळविलेल्या विजयानंतर सर्वत्र कौतुक झाले.त्यानंतर सलग तीन वर्ष त्यांनी वयाची तमा न बाळगता बारामती येथील आयोजित स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवित हॅट्रीक साधली. तिसऱ्या वर्षी त्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धावल्या होत्या. हृदयविकारातुन त्यांनी पतीला वाचविले,मात्र,कोरोनापासुन त्यांना त्या वाचवू शकल्या नाही.करे यांच्या तिन्ही मुलींचे विवाह झाल्यावर हे कुटुंब सुमारे ९ वर्षांपूर्वी  बारामतीत वास्तव्यास आले आहे.बुलढाणा येथे उत्पन्नाचे साधन नसल्याने या कुटुंबाने बारामतीत स्थलांतरीत होण्याचा निर्णय घेतला.सध्या त्यांचा मुलगा एका कंपनीत चौकीदाराची नोकरी करतो,हे कुटुंंब एका भाड्याच्या खोतील वास्तव्यास आहे.

पतीसाठी अनवाणी धावत स्पर्धा जिंकणाऱ्या करे यांची आयुष्याच्या सत्तरीकडे वाटचाल करणाऱ्या वयातील जिद्द आणि यश पाहुन त्यांच्या जीवनावर चित्रपट देखील  काढण्यात आला आहे. लता भगवान करे,एक संघर्षकथा’ असे या चित्रपटाचे नाव आहे.विशेष म्हणजे करे यांनीच त्यांची मुख्य भूमिका चित्रपटात साकारली होती. दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती.तर नविन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.त्यांच्या जीवनावर आधारीत मराठी चित्रपटास ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये  विशेष पुरस्कार मार्च २०२१ मध्ये जाहीर झाला आहे.—————————————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याMarathonमॅरेथॉनDeathमृत्यूWomenमहिला