शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे बाजार समितीच्या गैरकारभाराच्या चौकशीसाठी अखेर स्वतंत्र समिती;पणन संचालकांनी दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:27 IST

- अखेर पणन संचालक विकास रसाळ यांनी दि.७ ला स्वतंत्र समिती नेमून जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली वर्ग एक व दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून स्वतंत्र चाैकशी समिती स्थापन केली आहे.

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून बाजार आवारात अनेक गैर कामे केली गेली आहेत. याबाबत विविध संघटना व व्यापारी यांनी बाजार समितीच्या अनेक कारभाराच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनीही चौकशीचे आदेश दिले होते. अखेर पणन संचालक विकास रसाळ यांनी दि.७ ला स्वतंत्र समिती नेमून जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली वर्ग एक व दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून स्वतंत्र चाैकशी समिती स्थापन केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळ अस्तित्वात आहे. तेव्हापासून बाजार आवारात अनेक अनियमित, बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने कामे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पणनमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीचे आदेश गुलदस्त्यात होते. यावर अखेर पणन संचालक यांनी स्वतंत्र समितीची नेमणूक करून चौकशीचा आहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

- अशी आहे स्वतंत्र समितीजिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमणूक केली असून यात सात अधिकाऱ्यांची समिती आहे. यामध्ये जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग १ चे संजय पाटील, उपनिबंधक सहकारी संस्थांचे दिगंबर हौसारे, विशेष लेखापरीक्षक वर्ग १ विजय सावंत, सहायक निबंधक सुनील धायगुडे, विशेष लेखापरीक्षक वर्ग २ सुनील जाधव तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर आदींचा समावेश आहे.५१ विविध कामांबाबतची होणार चाैकशी२०२३ पासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या कारभाराच्या विविध ५१ कामांबाबत चौकशी करण्याबाबतचे आदेश पणन संचालकांनी स्वतंत्र समितीला देण्यात आले आहेत. यात बाजारात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट, बाजार समितीने भुसार बाजारातील १९ भूखंडधारकांना नोटिसा दिल्यानंतरही अनेक भूखंडांवर अनधिकृत बांधकामे, बाजार आवारात पार्किंग निविदा, सुरक्षारक्षक निविदा, अतिरिक्त दरांच्या निविदा, अनधिकृत बांधकामे, सेस चोरी, फूल बाजारातील गाळे वाटप अशा ५१ मुद्द्यांची चाैकशी होणार आहे.

बाजार समितीने भुसार बाजारातील १९ भूखंडधारकांना नोटिसा बजावल्या, त्यानंतरही अनेक भूखंडांवर अनधिकृत बांधकामे केली. बाजार आवारात विविध ठिकाणी टपऱ्या तसेच पार्किंग निविदा, सुरक्षारक्षक निविदा या सर्व बाबी संदर्भात तक्रारी आल्या आहेत. आता स्वतंत्र उच्च स्तरीय समिती याबाबत चाैकशी करणार असून दोषींवर कारवाई केली जाईल.- विकास रसाळ, पणन संचालक  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी