...अखेर १०० टक्के क्षमतेला परवानगी मिळाली; नाट्य-चित्रपटसृष्टीला २ वर्षानंतर 'अच्छे दिन येणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 03:54 PM2022-03-04T15:54:02+5:302022-03-04T15:54:12+5:30

पुणे : नाट्यगृह आणि चित्रपटगृह शंभर टक्के आसन क्षमतेने कधी सुरू होणार? या प्रतीक्षेमध्ये असलेल्या निर्माता आणि कलाकार मंडळींना ...

finally 100 percent capacity allowed Drama film industry will have good days | ...अखेर १०० टक्के क्षमतेला परवानगी मिळाली; नाट्य-चित्रपटसृष्टीला २ वर्षानंतर 'अच्छे दिन येणार'

...अखेर १०० टक्के क्षमतेला परवानगी मिळाली; नाट्य-चित्रपटसृष्टीला २ वर्षानंतर 'अच्छे दिन येणार'

googlenewsNext

पुणे : नाट्यगृह आणि चित्रपटगृह शंभर टक्के आसन क्षमतेने कधी सुरू होणार? या प्रतीक्षेमध्ये असलेल्या निर्माता आणि कलाकार मंडळींना सरकारने महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात खुशखबर दिली आहे. त्यामुळे नाट्य-चित्रपटसृष्टीला दोन वर्षांनंतर खऱ्या अर्थाने अच्छे दिन येणार असून. कोरोनाकाळात मरगळ आलेल्या मनोरंजन क्षेत्राला पुन्हा उभारी मिळणार आहे. येत्या शुक्रवारी ( दि. ४) प्रदर्शित होणारे नवीन चित्रपट तसेच नाटकांचे प्रयोगही पुढील काळात शंभर टक्के आसन क्षमतेप्रमाणे लावण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, उद्यापासून (दि. ३) पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आयोजकांना ही गोड बातमी मिळाल्याने आता महोत्सवासाठी शंभर टक्के नोंदणी केली जाणार आहे.

शासनाने कोरोनाचे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करीत सार्वजनिक व्यवहारांना परवानगी दिली. मात्र, नाट्यगृह आणि चित्रपटगृहांसाठी पन्नास टक्के क्षमतेचाच नियम कायम ठेवला. त्यामुळे नाट्य व चित्रपट वर्तुळात नाराजीचा सूर पसरला होता. कोरोना केवळ नाट्यगृह व चित्रपटगृहांमधूनच पसरतो का? असा संतप्त सवालही उपस्थित करण्यात आला. पन्नास टक्के क्षमतेमध्ये नाटकांचे प्रयोग लावणे किंवा चित्रपट प्रदर्शित करणे परवडणारे नाही, असे काही निर्मात्यांचे म्हणणे होते. त्यामुळे नाट्यगृह आणि चित्रपटगृह शंभर टक्के क्षमतेने सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे देखील पाठपुरावा करण्यात आला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. मात्र, सद्य:स्थितीत शासनाने केवळ १४ जिल्ह्यांमध्येच १०० टक्के क्षमतेनुसार नाट्यगृह सुरू करण्यास परवानगी दिली आहे. नवी मुंबई, ठाणे, पनवेल, डोंबिवली, नाशिक या ठिकाणीही परवानगी द्यावी, अशी मागणी नाट्यनिर्मात्यांनी केली आहे.

राज्य शासनाने शंभर टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्याचा आनंद आहे. खरंतर हे आधीच होणे अपेक्षित होते. इतर राज्यांनी यापूर्वीच हा निर्णय घेतला होता. आता शुक्रवारपासून आम्ही शंभर टक्के क्षमतेने चित्रपटगृह सुरू करू. पुढील तीन ते चार महिन्यांत भरपूर चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामुळे चित्रपट व्यवसायाला निश्चितच उभारी मिळेल असे सिटी प्राइडचे पुष्कराज चाफळकर यांनी सांगितले.  

Web Title: finally 100 percent capacity allowed Drama film industry will have good days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.