शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

पीएमआरडीए मेट्रोची अंतिम निविदा प्रसिद्ध, हिंजवडी-शिवाजीनगर मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:24 IST

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी पात्र ठरलेल्या तीन निविदाधारकांना २७ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी पात्र ठरलेल्या तीन निविदाधारकांना २७ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच या कामाची प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल, अशी माहिती पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.राज्य शासनाने दि. २ जानेवारी २०१८ रोजी हा प्रकल्प राबविण्यास मंजुरी दिली आहे. मेट्रोच्या निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे. या कामासाठी टाटा रिअ‍ॅलिटी, सिमेन्स, आयएल, एफएस आणि आयआरबी या खासगी कंपन्या आर्थिक मदतीसाठी सहभागी झाल्या आहेत. यातून पात्र कंपनीची निवड केली जाणार आहे. देखभाल-दुरुस्तीची जबाबदारीदेखील या कंपनीचीच असेल.खासगी कंपन्यांनी सादर केलेल्या आर्थिक आराखड्याची तपासणी करूनच अंतिम एका कंपनीसोबत करार केला जाईल.>मेट्रो प्रकल्प हा सार्वजनिक वाहतुकीचा व हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणारा आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणारा प्रकल्प आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या विकासाकरिता खासगी कंपनीची निवड करण्यासाठी आर्थिक निविदा मागविण्यात आल्या आहेत. निवड झालेल्या खासगी कंपनीशी करार करून मेट्रोच्या कामाला सुरुवात होईल, असे गित्ते यांनी सांगितले.