डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: May 31, 2014 07:13 IST2014-05-31T07:13:20+5:302014-05-31T07:13:20+5:30
मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरामधील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. व
डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात
वडगाव मावळ : मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव शहरामधील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. वडगाव शहरातील मुख्य रस्ता खड्डेमय झाला होता. नागरिकांनी पावसाळ्याच्या अगोदर रस्त्याची कामे करावीत, अशी मागणी केली आहे. रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वडगावातील खंडोबा मंदिर ते पंचायत समिती चौक व पोलीस स्टेशनपर्यंत काम पूर्ण झाले आहे. पंचायत समिती चौक ते श्रीमंत महादजी शिंदे उद्यान व पोलीस चौकी ते दिग्विजय कॉलनीपर्यंतचे काम अपूर्ण आहे. ते दोन दिवसांत पूर्ण करणार असल्याची माहिती उपअभियंता डी वाय पाटील यांनी दिली. (वार्ताहर)