वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच अंतिम मान्यता : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:16 IST2021-08-25T04:16:35+5:302021-08-25T04:16:35+5:30

पुणे : महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, लवकरच ...

Final approval for medical college soon: Mayor | वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच अंतिम मान्यता : महापौर

वैद्यकीय महाविद्यालयाला लवकरच अंतिम मान्यता : महापौर

पुणे : महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, लवकरच अंतिम मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या अंतिम मान्यतेच्या पूर्ततेसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची मंगळवारी नवी दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली. या वेळी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार उपस्थित होते.

याबाबत मोहोळ म्हणाले, महापालिकेचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय, हे पुणे शहराची आरोग्य व्यवस्था सक्षम होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. आरोग्यमंत्र्यांच्या भेटीत तांत्रिक प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा झाली असून, सर्व बाबी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आरोग्यमंत्री मांडवीय यांनी अंतिम मान्यतेसाठी सकारात्मकता दाखवली आहे.

-----

फोटो मेल केला आहे.

फोटो- मोहोळ-मांडविया

Web Title: Final approval for medical college soon: Mayor