पुरस्कारपात्र होण्यापेक्षा चित्रपट दखलपात्र व्हावा
By Admin | Updated: February 7, 2017 03:15 IST2017-02-07T03:15:21+5:302017-02-07T03:15:21+5:30
चित्रपट या माध्यमाचे समाजमनावर प्रतिबिंब उमटत असते. या माध्यमातून मनोरंजन करतानाच चांगले विचार आणि संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत

पुरस्कारपात्र होण्यापेक्षा चित्रपट दखलपात्र व्हावा
पुणे : चित्रपट या माध्यमाचे समाजमनावर प्रतिबिंब उमटत असते. या माध्यमातून मनोरंजन करतानाच चांगले विचार आणि संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. त्यासाठी निर्मिती आणि दिग्दर्शनापासूनच मूल्ये रुजली पाहिजेत. कारण, चित्रपट पुरस्कारप्राप्त होण्यापेक्षा दखलपात्र होणे अधिक महत्त्वाचे असते. चित्रपटनिर्मितीतून शिक्षणाची मूल्ये जपली जावीत, असे मत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त
केले.
मूल्याधिष्ठित शिक्षण व्यवस्थेची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने ओमकार क्रिएशन संस्थेच्या वतीने ‘चित्रपट माध्यम, मनोरंजन आणि शिक्षण संवर्धन’ या विषयावरचा परिसंवाद सोमवारी पत्रकार भवनात आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात राजेभोसले यांच्यासह पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोहोळ, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, पुणे महानगरपालिकेच्या सहायक प्रशासकीय अधिकारी शिल्पकला रंधवे, पश्चिम महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे सचिव प्रमोद नेमाडे, दिग्दर्शक विश्वास रांजणे यांनी सहभाग घेतला. शिल्पकला रंधवे यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)