शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

विद्यापीठात मिळणार चित्रपट साक्षरतेचे धडे.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 19:58 IST

विद्यापीठातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या विभागातर्फे येत्या जुलैपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देयंदाच्या जुलैपासून चित्रपटविषयक अभ्यासक्रम सुरू होणारविद्यापीठात प्रथम होणा-या या प्रयोगासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने मोलाची भूमिका 'एनएफएआय'मध्ये जाऊन चित्रपट जतन करण्याचे तंत्रसुद्धा शिकायला मिळणार

पुणे:  चित्रपटाला केवळ पॅशन पुरतच मर्यादित न ठेवता त्याची निर्मिती प्रक्रिया...त्याची विविध अंग अभ्यासायची इच्छा आहे अशा चित्रपटप्रेमींसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात  ‘डिप्लोमा इन इंडियन फिल्म’ असा एक स्वतंत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. दिल्ली, हैद्राबाद आणि जाधवपूर नंतर आता पुण्यात हा चित्रपटविषयक अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. विद्यापीठात प्रथम होणा-या या प्रयोगासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने मोलाची भूमिका बजावली आहे. ज्यांना भारतीय चित्रपटांच्या अभ्यासात शैक्षणिक करिअर करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी विद्यापीठातील मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज या विभागातर्फे येत्या जुलैपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका (पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा) अभ्यासक्रम असून,सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अशा दुहेरी अभ्यासाचा त्यात समावेश आहे. प्रवेश प्रक्रिया विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नुकतीच सुरू झाली आहे.या अभ्यासक्रमाविषयी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम ‘लोकमत’ शी बोलताना म्हणाले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे भारतीय चित्रपटांचा अमूल्य असा ठेवा आहे. ग्रंथालय, सुसज्ज थिएटर संग्रहालयाकडे आहे.  या सुविधा विद्यार्थ्यांना चित्रपटांचा अभ्यास करण्यासाठी उपयोगात येऊ शकतील, यासाठी तीन वर्षांपासून प्रयत्न करीत होतो. एखाद्या अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याशी भेटून चर्चा केली. त्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर यंदापासून हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिक्षकांची एक फळी घडेल आणि चित्रसाक्षरतेच्या दृष्टीकोनातून एक चळवळ उभी राहील. लवकरच दोन्ही संस्थांमध्ये औपचारिक सांमजस्य करार केला जाणार आहे.     हा अभ्यासक्रम एका वर्षात दोन सत्रांत विभागलेला असेल. विविध शिष्यवृत्ती योजनांचा समावेश यात राहाणार असून, प्रवेश परीक्षेनंतर एकूण २५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पसुद्धा करावा लागणार असून, ऐच्छिक विषयसुद्धा निवडता येणार आहे. याशिवाय 'एनएफएआय'मध्ये जाऊन चित्रपट जतन करण्याचे तंत्रसुद्धा शिकायला मिळणार आहे.  सविस्तर माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPrakash Magdumप्रकाश मगदूमuniversityविद्यापीठMediaमाध्यमेcinemaसिनेमा