शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

क्या बात है! बारामतीच्या 'लता करे' यांच्यावर आधारित चित्रपटाची राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 16:27 IST

पतीच्या उपचारासाठी अनवानी पायाने धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या बारामतीच्या ६६ वर्षीय लता करे यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

बारामती : पतीच्या उपचारासाठी अनवानी पायाने धावत मॅरेथॉन स्पर्धा जिंकणाऱ्या बारामतीच्या ६६ वर्षीय लता करे यांच्या जीवनसंघर्षावर आधारित ‘लता भगवान करे; एक संघर्षगाथा’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

लताबाई मूळच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकरच्या. मोलमजुरीच्या जोरावर तीन मुलींची लग्न लावून दिली. आता हाताला काम शोधण्यासाठी बारामतीत आल्या आणि बारामतीकर झाल्या. त्यांच्या  संघर्षावर आधारित चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नविन देशबोनाई यांनी दिग्दर्शित केलेल्या वास्तव घटनेवर आधारित याचित्रपटात लता करे यांनीच मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच या चित्रपटात त्यांचे पती भगवान करे, मुलगा सुनील करे यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत.  या दोन्ही व्यक्तिरेखा या दोघांनीच साकारल्या आहेत. तसेच चित्रपटात रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे, बालकलाकार साक्षी यांच्या भूमिका आहेत.  या चित्रपटाला प्रशांत महामुनी यांचे संगीत असून पार्श्वसंगीत कन्नू समीर यांनी दिले आहे. 'एक मुंगी सुद्धा प्रचंड समुद्र पार करून जाऊ शकते आणि हे सामर्थ्य तुमच्यातही आहे. फक्त स्वत: ला ओळखण्याचा अवकाश आहे,असे लता करे सांगतात.

वयाच्या मर्यादा ओलांडत नियतीवर मात केलेल्या सामान्य महिलेच्या संघर्षाची प्रेरणादायी कथा असलेला ‘लता भगवान करे’ हा चित्रपट १७ जानेवारी २०२० साली प्रदर्शित झाला होता.

लताबाई मूळच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकरच्या. मोलमजुरीच्या जोरावर तीन मुलींची लग्न लावून दिली.हाताला काम शोधण्यासाठी बारामतीत आल्या.

त्यांचे पती भगवान करे हे हृदय विकाराच्या आजाराने अंथरुणाला खिळून होते. त्यांच्या उपचारासाठी थोडा पैसा मिळावा म्हणून लताबाईंनी बारामती मॅरेथॉनमध्ये भाग घेतला आणि नऊवारी साडीमधली ही ६६ वर्षांची बाई कडाक्याच्या थंडीत कुठल्याही स्पोर्टशूज शिवाय धावली. आणि सलग तीन वर्षे लता करे यांनी ही स्पर्धा जिंकली होती.—————————————

टॅग्स :BaramatiबारामतीcinemaसिनेमाNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018WomenमहिलाMarathonमॅरेथॉन