राज्यमंत्री भरणे यांच्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:15+5:302021-05-05T04:16:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बावडा: इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची करमाळा येथे प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणाऱ्या विरोधकांचा बावडा ...

राज्यमंत्री भरणे यांच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बावडा: इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची करमाळा येथे प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढणाऱ्या विरोधकांचा बावडा येथे तीव्र निषेध करण्यात आला. राज्यमंत्री भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून करमाळा येथे विरोधकांनी निषेध केला.
बावडा ग्रामपंचायतीच्या सदस्या सारिका शीतल कांबळे, अमोल कांबळे, भैया जाधव, लखन भोसले आदी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कोविडचे नियमपाळीत मोजक्या कार्यकर्त्यांसह भरणे विरोधकांचा तीव्र निषेध केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. भरणे यांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती विठ्ठल कांबळे यांनी दिली.
या बैठकीत बोलताना सारिका कांबळे म्हणाल्या, उजनी धरणाच्या निर्मिती वेळी इंदापूर तालुक्यातील २८ गावांतील ३६ हजार क्षेत्र गेले आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्यावर प्रथम इंदापूर तालुक्याचाच हक्क आहे. हे पाणी दुष्काळी २२ गावांना मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम भरणे यांनी केले असून, यामुळे सोलापूर जिल्ह्यावर कसलाही अन्याय झाला नाही, असे त्या म्हणाल्या.
बावडा ग्रामीण रुग्णालय सुरू होण्यासाठी आम्ही ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत ‘लोकमत’ने छायाचित्रासह प्रसिद्धी दिल्यानंतर रुग्णालय सुरू करण्यात आले. त्याबद्दल लोकमतचे आभार मानून सारिका कांबळे म्हणाल्या, हे रुग्णालय सुरू झाले असले तरी या ठिकाणी अपुऱ्या सुविधा असल्याने पूर्ण उपचार मिळू शकत नाही. भरणे यांनी १०० बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे जाहीर केले आहे. त्याची लवकर शासनाकडून पूर्तता करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.