शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

नीरा येथे भरधाव कंटेनर घुसला दुकानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 23:44 IST

पाडेगाव टोलनाक्यावरील घटना : सात व्यावसायिकांचे नुकसान

नीरा : पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पाडेगाव टोलनाक्यावर शनिवारी पहाटे दीड वाजता भरधाव कंटेनर बंद टोलनाक्याशेजारील व्यावसायिकांच्या दुकानात घुसला. त्यामुळे सात दुकानांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व व्यावसायिकांच्या दुकानाचे पुढील भागाचे शटर जमीनदोस्त झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

मागील महिन्यात टोलनाक्यात एक कंटेनर शिरला होता. तेव्हापासून हा टोलनाका नादुरुस्तच आहे. टोलनाक्याच्या छताचा काही भाग खाली आलेला तसाच आहे. रात्री अंधारात तो भाग अचानक दिसल्याने चालक घाबरला व त्याने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी कंटेनर डाव्या बाजूला घेतल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. या भीषण अपघातानंतर बंद टोलनाक्याविषयी लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुकानांच्या सर्व भिंतींना तडे गेले आहेत. रात्री कोणी या ठिकाणी झोपण्यास नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. या परिसरात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचे पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, आश्रम शाळा-कॉलेज, मंगल कार्यालय इत्यादी वर्दळीची ठिकाणे आहेत. रात्री उशिरा अपघात झाल्याने मोठा अनर्थ टळला.पाडेगाव येथील टोलनाका हा १ जुलै २०१४ रोजी महाराष्ट्रातील ४४ टोलनाके बंद करण्यात आले त्यापैकी आजही हा टोलनाका का उभा आहे. यावर कोणीच मेहरनजर आहे, हा प्रश्न आहे. टोलनाका बंद असला तरीही हा भाग कायम गजबजलेला असतो. नीरा नदीवरील उंच पूल व लोणंद येथील रेल्वे क्रॉसिंग येथे उड्डाणपुलासह रस्ता रुंदीकरण सन २००३-०५ मध्ये करण्यात आले. बांधा वापरा हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर हे काम करण्यात आले. २०१४ मध्ये मुदत संपल्यानंतर टोलवसुली थांबवण्यात आली. तेव्हापासून आजतागायत टोलनाका तसाच उभा आहे. टोलनाक्यावर मोठे शेड असल्याने रात्री चंद्राचाही प्रकाश रस्त्यावर पडत नाही. परिणामी सगळ्या परिसरात अंधार असतो. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात