आॅप्शन फॉर्म भरताना...
By Admin | Updated: June 19, 2014 05:15 IST2014-06-19T05:15:51+5:302014-06-19T05:15:51+5:30
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला

आॅप्शन फॉर्म भरताना...
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशप्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, विद्यार्थ्यांना १९ ते २३ जूनपर्यंत महाविद्यालयांचे पसंतीक्रम आॅनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत. दहावीत मिळालेले गुण, संबंधित महाविद्यालयांचा मगील वर्षाचा कट आॅफ आणि शाळा व महाविद्यालयाचे घरापासूनचे अंतर याचा विचार करून विद्यार्थी व पालकांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम अर्जात (आॅप्शन फॉर्म) भरावयाचे आहेत. तेव्हाच विद्यार्थ्याला त्याच्या आवडीचे व जवळचे महाविद्यालय मिळू शकेल, असे अकरावी प्रवेश समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती शिक्षण उपसंचालक सुमन शिंदे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सहायक शिक्षण उपसंचालक बाळासाहेब ओव्हाळ, गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकांत गुप्ता, तसेच एमकेसीएलचे समन्वयक संदीप चिपळूणकर उपस्थित होते.
शिंदे म्हणाल्या, की काही विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन
प्रवेशप्रक्रियेचा पहिला भाग
भरून घेतला आहे. आत्तापर्यंत सुमारे ५७ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाईन
अर्ज भरले असले, तरी अद्याप ६ हजार ४१४ विद्यार्थ्यांनी पहिला भाग
अॅप्रूव्ह केलेला नाही. ज्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरलेला नाही त्यांनी २३ जूनपर्यंत प्रवेशअर्जाचा पहिला व दुसरा भाग भरून पूर्ण करावा. जे विद्यार्थी प्रवेशअर्ज भरून देणार नाहीत ते प्रवेशप्रक्रियेच्या बाहेर फेकले जाणार असल्याचे सांगण्यात आले. आॅप्शन फॉर्म भरताना विद्यार्थ्यांना व पालकांना काही अडचणी आल्यास त्यांनी प्रवेश समितीने स्थापन केलेल्या मार्गदर्शन किंवा आपल्या विभागातील शिक्षण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेत मार्गदर्शक केंद्रांची व संपर्क प्रमुखांची नावे व दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)