बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:01 IST2018-04-10T01:01:53+5:302018-04-10T01:01:53+5:30

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन सोमवारी स्थगित झाल्यामुळे आता बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्यापासून नियामक (मॉडरेटर्स) तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाच्या कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी माहिती दिली.

Fill out the results of HSC result timely | बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा

बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा

पुणे : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे आंदोलन सोमवारी स्थगित झाल्यामुळे आता बारावीचा निकाल वेळेवर लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्यापासून नियामक (मॉडरेटर्स) तपासलेल्या उत्तरपत्रिका बोर्डाच्या कार्यालयात जमा करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू होते. शिक्षण मंत्र्यांबरोबर महासंघाची सकारात्मक बैठक झाली. बैठकीत मूल्यांकन झालेल्या कायम विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची यादी उद्या पासून आॅनलाइन जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. तसेच इतर मागण्यांच्या बाबतीत निर्णय झाला असून शासनाने तसे पत्रकही संघटनेस दिले आहे.
२०१२ पासून नियुक्त व ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या सर्व शिक्षकांना तातडीने नियुक्ती मान्यता देण्यात येईल, इतर मागण्यांसाठी दि.१७ एप्रिल २०१८ रोजी अर्थ मंत्र्यांबरोबरच्या संयुक्त बैठकीत निर्णय करणार या मागण्या मान्य केल्या आहेत.

Web Title: Fill out the results of HSC result timely