शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

स्मार्ट सिटीत मतदार संपर्कावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:35 AM

शेतमजुरांशी श्रीरंग बारणे यांचा संवाद; महायुतीची पिंपरी कॅम्पमध्ये फेरी

पिंपरी : मावळ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवड परिसरात शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथे रॅली काढली. त्यात पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील व्यापारी बांधव सहभागी झाले होते.स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडमध्ये मतदार संपर्क आणि संवादावर भर दिला आहे. रॅलीची सुरुवात आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी येथून झाली. ही रॅली पुढे बौद्धनगर, भाटनगर, मेन बाजार, शगुन चौक, साई चौक, जायका चौक, जयहिंद चौक, अशोक थिएटर परिसर, डीलक्स रोड, रिव्हर रोड, सुभाषनगर आणि पुन्हा शगुन चौक या मार्गावरून काढली. या वेळी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार, नगरसेवक संदीप वाघेरे, दीपक मेवानी, किशोर केसवानी, लच्छू बुलानी, कमल मलकानी, ज्योतिका मलकानी, आरपीआयचे लक्ष्मण गायकवाड, शिवसेनेचे डॉ. अभिजित भालशंकर, विभागप्रमुख अनिल पारचा, उपविभागप्रमुख शेखर महाडिक, सोनू शिरसाट उपस्थित होते.थेरगावात कोपरा सभा झाली. त्या वेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी मार्गदर्शन केले. या वेळी नगरसेविका अर्चना बारणे, नगरसेवक नीलेश बारणे, अभिषेक बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, काळूराम बारणे, तानाजी बारणे उपस्थित होते. जगताप म्हणाले, की चिंचवड मतदारसंघातून महायुतीला मताधिक्य दिले पाहिजे. सर्वांनी आपण स्वत: उमेदवार आहोत, असे समजून काम करायचे आहे. पंतप्रधान आवास योजना, अमृत योजना, २४ बाय ७ ही पाणीपुरवठ्याची योजना शहरात सुरू आहे. केंद्र सरकार या योजनांना सहकार्य करीत आहे. खासदार बारणे यांनी केंद्र सरकारशी निगडित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. शेतमजुरांशी संवादमावळातील विविध गावांना बारणे यांनी भेट दिली. तसेच धामणे येथील शेतमजुरांशी संवाद साधला. या वेळी परिसरातील गावांनाही त्यांनी भेट दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळShiv Senaशिवसेना