शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडी कराल तर होतील गुन्हे दाखल!; पुणे पोलिसांचा मंगल कार्यालयांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 12:23 IST

डीजे बँडबाजाच्या वरातींमुळे किवा पार्किंगच्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, तर पोलिसांकडून आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.

ठळक मुद्दे विश्रांतवाडी विभागातील तीन मंगल कार्यालयचालकांवर गुन्हे दाखलवाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातही करणार गुन्हे दाखल

विमाननगर : लग्नसराईत डीजे बँडबाजाच्या वरातींमुळे किवा पार्किंगच्या वाहनांमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली, तर पोलिसांकडून आता थेट गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. शहरातील वाढती वाहनांची संख्या, रस्त्यावरील विविध अडथळे, तसेच बेशिस्तपणे केली जाणारी वाहनांची पार्किंग यामुळे अनेक ठिकाणी कोंडीची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. मंगल कार्यालयचालकांना वेळोवेळी सूचित करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या विश्रांतवाडी विभागातील तीन मंगल कार्यालयचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त महादेव गावडे यांनी दिली. याप्रकरणी विजय रामचंद्र भिसे, सुदर्शन सुनील वावळ, शरद परशुराम साकोरे यांच्याविरुद्ध सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करून पादचाऱ्यांना चालण्यासाठी अडथळा व त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल भादंवि कलम २८३ व २९१ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त महादेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतवाडी विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सी. व्ही. केंद्रे व कर्मचारी यांनी ही कारवाई करून गुन्हे दाखल केले.  शहरातील वाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातही अशा प्रकारे लग्नसोहळ्यातील वरातींमुळे वाहतूककोंडी झाल्यास गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंगल कार्यालयाबाहेर होणाऱ्या कोंडीमुळे वाहतूक विभागाकडून कार्यालयाच्या चालक व मालक यांना वेळोवेळी सूचित केले जाते. कार्यालयातील येणाऱ्या वाहनांची पार्किंग अस्ताव्यस्त करून दिघी मॅगझीन चौक ते भोसरी रोडवर प्रचंड वाहतूककोंडी केल्याप्रकरणी हिरा लॉन्स, राम स्मृती मंगल कार्यालय व माऊली लॉन्सच्या व्यवस्थापकांवर विश्रांतवाडी वाहतूक विभागाने गुन्हे दाखल केले.

टॅग्स :Puneपुणेvishrantwadi policeविश्रांतवाडी पोलीस