शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या कमवा शिका योजनेच्या तीन समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 19:46 IST

कमवा शिका योजनेतील तीन समन्वयकांनी संगनमत करुन विद्यार्थ्यांची खोटी नावे देऊन, त्यांच्या नावे असलेले पैसे स्वत:च्या बॅँक खात्यावर घेतले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांची खोटी नावे दाखवून परस्पर पैसे लाटले असल्याची माहिती समोर

पुणे : सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील कमवा शिका योजनेच्या तीन समन्वयकांवर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात त्या गुन्हा दाखल झाला आहे. योजनेतील गैरव्यवहार प्रकरणात त्यांनी ३ लाख ४६ हजार ८६० रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यातून विद्यार्थ्यांची खोटी नावे दाखवून परस्पर पैसे लाटले असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विद्यापीठातर्फे एका ४३ वर्षीय शिक्षकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फियार्दी सावित्रीबाई फुले विद्यापीठात संचालक विद्यार्थी विकास मंडळ (अतिरिक्त कारभार) या पदावर कार्यरत आहेत. यातील कमवा शिका योजनेतील तीन समन्वयकांनी संगनमत करुन विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील, कमवा आणि शिका योजनेत विद्यार्थ्यांची खोटी नावे देऊन, त्यांच्या नावे असलेले पैसे स्वत:च्या बॅँक खात्यावर घतले. तर काही विद्यार्थी हे कमवा शिका योजनेत काम करत नसताना, त्यांना या योजनेतील विद्यार्थी दाखवून त्यांच्या बँक खात्यावर पैसे टाकून नंतर ते पैसे रोख स्वरुपात घेतले. याप्रकारे विद्यापिठाची ३ लाख ४६ हजार ८६० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. दराडे करत आहेत. विद्यापीठात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी विविध जिल्ह्यातील विद्यार्थी प्रवेश घेतात. हे विद्यार्थी या योजनेत सहभाग घेतात. मात्र समन्यकांनी प्रत्यक्ष काम न करणाºया विद्यार्थ्यांची नाव देऊन विद्यार्थ्यांचा मानधनाच्या स्वरुपात मोबदला काढला. हा मोबदला तिघा समन्वयकांनी लाटला. योजनेत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी काही विद्यार्थ्यांनी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे केली होती. त्यांनी दखल घेत माजी कुलगुरु डॉ. अरुण अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीला लेखी व ठोस स्वरुपात पुरावे मिळाले होते. यानंरत चौकशी समितीने अहवालात हा गैरव्यवहार अतिशय गंभीर स्वरुपाचा असून मागील अनेक वर्षे चाललेला आहे. 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठfraudधोकेबाजीPoliceपोलिसStudentविद्यार्थी