अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:12 IST2021-03-31T04:12:19+5:302021-03-31T04:12:19+5:30

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: नीरा येथील वार्ड नंबर दोन मध्ये राहणारी एक अल्पवयीन मुलीवर तिच्याजवळच राहणाऱ्या एका मुलाने ...

Filed a case against a minor girl | अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एकावर गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: नीरा येथील वार्ड नंबर दोन मध्ये राहणारी एक अल्पवयीन मुलीवर तिच्याजवळच राहणाऱ्या एका मुलाने फिर्यदीस चल एन्जॉय करू असे म्हणत नीरा रेल्वे स्टेशन मध्ये रेल्वेच्या मोकळ्या बोगीत नेले व तिथे गेल्यावर माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे म्हणत त्याने फिर्यादीवर अत्याचार केला. याबद्दल कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर या मुलीस ससून येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पोलिसांनी फिर्यादीचा ससून येथे जावून जबाब घेतला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. तपास भोर पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील व जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा पोलीस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक कैलास गोतपागर करीत आहेत.

Web Title: Filed a case against a minor girl