खोटी साक्ष दिल्याप्रकरणी मुलीसह वडिलांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:09 IST2021-04-25T04:09:46+5:302021-04-25T04:09:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाच्या विरोधात मुलीच्याच फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र न्यायालयात ...

Filed a case against the father along with the daughter for giving false testimony | खोटी साक्ष दिल्याप्रकरणी मुलीसह वडिलांवर गुन्हा दाखल

खोटी साक्ष दिल्याप्रकरणी मुलीसह वडिलांवर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणाच्या विरोधात मुलीच्याच फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र न्यायालयात मुलीसह तिच्या वडिलांनीही खोटी साक्ष दिल्यामुळे आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. त्यामुळे न्यायालयात साक्ष देताना फितूर झालेल्या मुलीसह तिच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा आदेश दिला. दोघांविरोधात कलम १९१ (खोटी साक्ष देणे व खोटा पुरावा देणे) नुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयातील नाझर यांना दिले आहेत. शिरूर तालुक्यातील १७ वर्षीय तरुणी ही कॉलेजला जात असताना तरुण तिचा पाठलाग करीत होता. त्या वेळी आरोपी तिचा पाठलाग करीत ‘तू मला आवडते’ असे म्हणाला होता. तसेच एक दिवस त्याने तिला मिठी मारली होती. मात्र मुलीने त्याला सांगितले की ‘माझे तुझ्यावर प्रेम नाही. त्यामुळे मला त्रास देऊ नको.’ त्यामुळे चिडलेल्या आरोपीने मुलगी आणि तिच्या भावाला जिवे मारण्याची धमकी दिली होती. दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. त्यानंतरही मुलाचा त्रास सुरू असल्याने ६ मे २०१७ रोजी मुलीने रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी पाच साक्षीदार तपासले. त्यात मुलीची आणि तिच्या वडिलांची साक्ष महत्त्वाची होती. मात्र दोघेही फितूर झाले व त्यांनी न्यायालयात खोटी साक्ष दिली. आरोपीने माझा पाठलाग केलाच नाही, असे मुलीने न्यायालयात सांगितले.

----------------------------------------------------------------------

Web Title: Filed a case against the father along with the daughter for giving false testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.