शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशी नागरिक हटाव प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 20:38 IST

शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेकायदेशीरपणे जमाव जमवून बांगला देशी म्हणणाऱ्या व घरामध्ये बेकायदेशीरपणे शिरल्याबद्दल सहकारनगर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे़. 

पुणे : बांगलादेशी नागरिकांची शोध मोहिम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे़.  बांगलादेशी असल्याचा संशय घेऊन बेकायदेशीरपणे घरात शिरुन धमकी दिल्या प्रकरणी सहकारनगरपोलिसांनीमनसे शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यासह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.याप्रकरणी रोशन नुरहसन शेख (वय ३५, रा़ गुलमोहर अपार्टमेंट, बालाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे़.  बांगलादेशी असल्याचा संशय घेऊन मनसेचे अजय शिंदे, सचिन काटकर व त्यांच्या ७ ते ८ साथीदारांनी  २२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता बालाजीनगरमधील गुलमोहर अपार्टमेंटमध्ये शिरले. त्यांनी रोशन शेख व इतरांच्या घरात शिरुन तुम्ही बांगलादेशी आहे़,असे म्हणून त्यांना घरातून बाहेर आणले़.  तुम्हाला भारतात राहण्याचा अधिकार नाही, अशी धमकी दिली आहे़. अचानक घडलेल्या या प्रकाराने हे सर्व जण घाबरले़.

 त्यानंतर त्यांनी सर्वांना घराच्या बाहेर इमारतीच्या खाली घेऊन आले़. त्यांच्याबरोबर दिलशाद अहमद हसन (वय ३५), बप्पी नेमाई सरदार (वय२७) यांना ही बांगला देशी समजून खाली रोडवर आणले़. त्यावेळी त्यांनी आधार कार्ड व मतदान कार्ड त्यांना दाखविले़ तसेच आपण भारतीय असलयाचे सांगितले़. तरीही त्यांना जबरदस्तीने सहकारनगर पोलीस ठाण्यात आणले़. तेथे त्यांनी पोलिसांना पुरावे दाखविले़ पोलिसांनी त्यांची चौकशी करुन पुरावे पाहून त्यांना सोडून दिले होते.शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेकायदेशीरपणे जमाव जमवून बांगला देशी म्हणणाऱ्या व घरामध्ये बेकायदेशीरपणे शिरल्याबद्दल सहकारनगर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे़. पोलीस निरीक्षक विजय पुराणिक अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :MNSमनसेCrime Newsगुन्हेगारीSahakar NagarसहकारनगरPoliceपोलिस