शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रावण दहन केल्यास अॅट्राेसिटीचा गुन्हा दाखल करा ; भीम अार्मीची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 12:25 IST

रावण हा अादिवासी, बहुजन समाजाचा राजा असल्याने रावण दहनाला भीम अार्मीकडून विराेध करण्यात अाला अाहे.

पुणे : रावण हा सर्वांना न्याय देणारा, न्यायप्रिय राजा हाेता. असे असताना इतिहासाचे विकृतीकरण करुन रावणाला खलनायक ठरविण्यात अाले. तसेच दरवर्षी दसऱ्याला रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. रावण हा अादिवासी, बहुजन समाजाचा नायक असल्याचे म्हणत भीम अार्मीकडून रावण दहनास विराेध करण्यात अाला अाहे. भीम अार्मीकडून पाेलीस अायुक्तालायाला निवेदन देण्यात अाले असून रावण दहनास परवानगी नाकारण्याची मागणी करण्यात अाली अाहे. तसेच काेणी रावण दहन केल्यास अॅट्राेसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली अाहे. त्यामुळे अाता नव्या वादाला ताेंड फुटले अाहे.     रावण हा मानवतावादी समृद्ध व वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक अाहे. उत्कृष्ट समासव्यवस्थेचा उद्गाता, सर्वांना समान न्याय देणारा न्याय प्रिय राजा हाेता. असे असताना इतिहासाचे विकृतीकरण करुन परंपरेच्या नावाखाली रावणाला खलनायक ठरवून दरवर्षी त्याच्या प्रतिमेचे दहन केले जाते. ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांची इतिहासात बदनामी केली गेली त्याप्रमाणे षडयंत्र अाखून सांसृतिकदृष्ट्या रावणाला उद्वस्त करण्याचा प्रयत्न इतिहासाच्या माध्यमातून केला जात अाहे. रावण हा अादिवासी, बहुजन समाजाचा नायक असल्याने त्याच्या दहनाला तीव्र विराेध असल्याचे भीम अार्मीने दिलेल्या निवेदनाता म्हंटले अाहे. 

    तसेच रावण दहन कार्यक्रमातून दलित, अादिवासी, अनुसुचित जाती-जमाती व समाजाचा अपमान हाेत असल्याने या कार्यक्रमाला परवानगी नाकरण्याची मागणी करण्यात अाली अाहे. तसेच काेणी हा कार्यक्रम केल्यास त्यांच्यावर अॅट्राेसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा अाम्हाला रस्त्यावर उतरुन विराेध प्रकट करावा लागेल. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पाेलिसांची असेल असेही भीम अार्मीकडून सांगण्यात अाले अाहे. 

    दरम्यान यावर पाेलीस काय भूमिका घेतात याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले अाहे.

टॅग्स :PuneपुणेDasaraदसराAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदाPoliceपोलिस