शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

DSK Bail News: डीएसकेंच्या जामीन अर्जाबाबत प्रत्युत्तर दाखल करा; सर्वोच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 17:00 IST

डीएसके यांनी अँड. रितेश येवलेकर आणि अँड. आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला केला होता

पुणे : गुंतवणूकदारांची करोडो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) यांच्या जामीन अर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावून चार आठवड्यांत प्रत्युत्तर देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, विशेष सरकारी वकिलांनी उत्तर दाखल करण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. त्यानुसार सरकारला दोन आठवड्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.    गेल्या चार वर्षांपासून कोठडीत असलेले डीएसके यांनी सर्वोच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यावर सर्वोच्च न्यायालयात २१ फेब्रुवारी रोजी सुनावणी झाली होती. त्यामध्ये बचाव पक्षाने केलेल्या युक्तिवादानंतर राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आली होती. डीएसके खटला हा खटला अंमलबजावणी संचालनालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची सुनावणी मुंबईत आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) न्यायालयात होत आहे. खटला वर्ग झाल्यानंतर डीएसके यांनी अँड. रितेश येवलेकर आणि अँड. आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.  कुलकर्णी हे ७२ वर्षांचे ज्येष्ठ नागरिक आहेत. या गुन्ह्यात ते चार वर्षांहून अधिक काळ तुरुंगात आहेत. आरोपपत्र तसेच पुरवणी आरोपपत्र याआधीच अनुक्रमे आॅगस्ट २०१८ आणि नोव्हेंबर २०१८ मध्ये दाखल करण्यात आले आहे. मात्र, अद्याप आरोपींविरुद्ध खटला सुरू झालेला नाही. तपास यंत्रणांनी डीएसकेंची सर्व मालमत्ता आधीच जप्त केलेली आहे. त्यामुळे ते किंवा इतर आरोपी पुराव्याशी कोणतीही छेडछाड करण्याची शक्यता नाही. तसेच न्यायप्रविष्ट खटल्याखालील कैद्यांना एवढ्या मोठ्या कालावधीसाठी कोठडीत ठेवता येणार नाही, असा युक्तिवाद अँड. येवलेकर आणि अँड. श्रीवास्तव यांनी केला.

''युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने राज्य सरकारला चार आठवड्यांत प्रतिवाद करण्याजोगे उत्तर दाखल करण्याची नोटीस बजावली. दरम्यान, राज्य सरकारने प्रतिवादी वकील म्हणून विशेष सरकारी वकील नियुक्त केले. 25 मार्च रोजी सरकारी वकील सर्वोच्च न्यायालयात हजर झाले. त्यांनी न्यायालयाला विनंती केली की या प्रकरणात उत्तर दाखल करण्यासाठी कृपया वेळ द्यावा. त्या नुसार न्यायालयाने उत्तर दाखल करण्यासाठी वकिलांना दोन आठवड्यांचा कालावधी दिला असल्याची माहिती अँड आशुतोष श्रीवास्तव यांनी दिली.'' 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालयPoliceपोलिसState Governmentराज्य सरकारadvocateवकिल