शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'त्या'च्यासाठी एकच शब्द 'मृत्युंजय';३५ दिवस मृत्यूशी झुंज देत नवजात बालकाने जिंकली कोरोनाविरोधात लढाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 20:11 IST

जन्मतः बाळाचे वजन होते फक्त १.८ किलो आणि त्यात ते कोरोनाबाधित...

ठळक मुद्देबाळ आणि आई दोघांमध्येही अँटीबॉडी टेस्ट पॉझिटीव्ह

पुणे : एका खाजगी रूग्णालयात आईने नऊ महिने पूर्ण होण्याआधीच बाळाला जन्म दिला. जन्मतः बाळाचे वजन फक्त १.८ किलो होते आणि त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता. तपासणीअंती बाळ कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. बाळाला भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. पुढील दोन दिवसात बाळाची श्वासोच्छवासाची अडचण वाढत गेली. बाळाला २२ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवावे लागले. अद्ययावत उपचार आणि डॉक्टरांच्या टीमने दाखविलेल्या तत्परतेमुळे बाळाने ३५ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर लढाई जिंकली.

कोरोनाबाधित बाळाला फुफ्फुसात ‘सर्फेक्टंट’ नावाच्या विशेष औषधाचे दोन डोस देण्यात आले. त्याला हाय फ्रीक्वेंसी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. ऑक्सिजनच्या वितरणास मदत करण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड नावाचा एक विशेष वायू देखील वापरला गेला. इंट्रावेनस इम्युनोग्लोबुलिन ही विशेष थेरपीही दिली गेली. 

एक्सरेमध्ये दोन्ही फुफ्फुसांत विस्तृत पसरलेला न्यूमोनिया दिसत होता. बाळाच्या रक्ताच्या सर्व तपासण्या ‘सायटोकाईन स्टॉर्म’ असल्याचे सूचित करत होत्या. बाळ आणि आई दोघांमध्येही अँटीबॉडी टेस्ट पॉझिटीव्ह आली. म्हणजे आईलाही कोरोना होऊन गेला होता. पालकांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर बाळाला ५ दिवस उच्च डोस स्टिरॉइड्स दिले गेले. त्यानंतर बाळाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली.

बाळ २२ दिवस व्हेंटिलेटरवर राहिले, त्यापैकी हाय फ्रीक्वेंसी वेंटिलेटर १६ दिवसांच्या कालावधीसाठी होते. ही एक अपवादात्मक घटना आहे. अखेरीस २५व्या दिवशी बाळास व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले. या टप्प्यावर, छातीच्या सीटी स्कॅनमध्ये फुफ्फुसात काही फायब्रोसिस दिसून आले. अशा प्रकारचे फायब्रोसिस गंभीर कोरोनामधून बऱ्या झालेल्या काही प्रौढ रुग्णांमध्ये दिसून आले आहेत. काही दिवसांच्या ऑक्सिजन थेरपीनंतर, ३५ व्या दिवशी बाळाला घरी सोडण्यात आले, अशी माहिती  नवजात बालक अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप सूर्यवंशी यांनी दिली.

टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस