"तुला मस्ती आली का,माझ्या दुकानातील कामगारांना का बोलावलं", असं म्हणत दोन भंगार व्यावसायिकांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 02:59 PM2021-09-07T14:59:20+5:302021-09-07T14:59:27+5:30

जेवणासाठी कामगारांना बोलावल्याने रॉडने मारहाण करुन केला खुनाचा प्रयत्न

A fight broke out between two scrap dealers, saying, "Did you have fun, why did you call the workers in my shop?" | "तुला मस्ती आली का,माझ्या दुकानातील कामगारांना का बोलावलं", असं म्हणत दोन भंगार व्यावसायिकांमध्ये हाणामारी

"तुला मस्ती आली का,माझ्या दुकानातील कामगारांना का बोलावलं", असं म्हणत दोन भंगार व्यावसायिकांमध्ये हाणामारी

Next

पुणे : एका भंगार विक्रेत्याने स्वत: नवीन दुकान टाकल्यानंतर भावाला मुलगी झाल्याच्या कारणावरुन कामगारांसाठी पार्टी ठेवली होती. कामगारांना जेवायला बोलावल्याच्या रागातून एका भंगार विक्रेत्याने दुसऱ्या भंगार विक्रेत्यावर लोखंडी रॉडने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याविरुद्ध परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी रमेश कुमार ऊर्फ राजन जीवनलाल आग्राहरी (वय ३२, रा. साईनाथनगर, जुना मुंढवा रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अहमंद महंमद पुरीयल (रा. नागपूर चाळ, येरवडा), जाकीर मोतीलाल तांबोळी (रा. यमुनानगर, विमाननगर) यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन तांबोळी याला अटक केली आहे. हा प्रकार वडगाव शेरी येथील सोपानगरमधील आग्राहरी स्कॅप सेंटरमध्ये सोमवारी सकाळी ११ वाजता घडला.

रमेशकुमार हे पुरीयल यांच्या भंगाराच्या दुकानात १० वर्षे काम करीत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:चे भंगाराचे दुकान सुरु केले. रमेशकुमार यांचा भाऊ अखिलेश याला मुलगी झाल्याने त्याने कामगारांसाठी जेवणाची पार्टी ठेवली होती. त्याला पुरीयल याच्या दुकानातील ८ ते १० कामगारांना जेवायला बोलवले होते. त्याचा राग येऊन पुरीयल व तांबोळी हे त्याच्या दुकानात आले. रमेशकुमार याला शिवीगाळ करुन तुला मस्ती आली का, माझ्या दुकानातील कामगारांना का बोलावले, असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारुन जबर जखमी केले.

त्याविरोधात अहमंद पुरीयल यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रमेशकुमार आग्राहरी, लालु ऊर्फ अखिलेश आग्राहरी, लाला ऊर्फ अवधेश आग्राहरी आणि एका अनोळखी अशा चौघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यातील लाला आग्राहरी याला अटक केली आहे.

पुरीयल याने रमेशकुमार याला ५ लाख रुपये हात उसने दिले आहेत. ते दिलेले पैसे मागण्याकरीता ते व कामगार जाकीर तांबोळी हे आग्राहरी स्क्रेप सेंटरमध्ये गेले होते. पैशांची मागणी करुन फिर्यादीने रमेशकुमार याला शिवीगाळ करत ‘‘तू माझे फेरीवाल्यांना भंगारचे बाजारभावाबाबत का फितवतो’’ अशी विचारणा केली. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी याच्या कपाळावर व नाकावर रॉडने मारुन गंभीर जखमी केले.

Web Title: A fight broke out between two scrap dealers, saying, "Did you have fun, why did you call the workers in my shop?"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.