शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी आणि भाजपात लढत चुरशीची; मात्र सरशी कुणाची हे 'गुलदस्त्या'तच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 21:28 IST

दोन्ही पक्षाचा वर्चस्वाचा दावा : सरपंच सोडतीकडे सर्वांचे लक्ष

सागर शिंदे -

इंदापूर : इंदापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक २०२१ अतिशय चुरशीची झाली यामध्ये इंदापूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत व भाजपा पुरस्कृत अनेक पॅनल व स्थानिक आघाडी तसेच सर्वपक्षीय पॅनल यांनी एकूण ६० ग्रामपंचायतीत जोर लावून निवडणूका लढल्या. सोमवार ( दि. १८ ) रोजी या साठही ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर करण्यात आला. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ६० पैकी ३७ व ४ ग्रामपंचायती संमिश्र आहेत असे सांगत ३७ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वर्चस्व तालुक्यात निर्माण झाले आहे असे जाहीरपणे सांगितले आणि इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर प्रसिद्धी पत्रक काढत पत्रकारांना माहिती दिली. 

तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ६० पैकी ३८ व ४ संमिश्र ग्रामपंचायती आहेत असे सांगत, ३८ ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे असे सांगत जाहीरपणे प्रसिद्धी पत्रक काढून माध्यमांना माहिती दिली. 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व भारतीय जनता पार्टी यांनी आपापल्या पक्षाच्या वतीने ग्रामपंचातींवर दावा केला आहे. मात्र निवडणूक लढवून निवडून आलेल्या उमेदवारांचे सर्व लक्ष सरपंच आरक्षण सोडतीकडे लागले आहे. आता सरपंच कोणाचा आणि कोणत्या पक्षाचा होणार हे येणार काळ ठरवेल. 

इंदापूर शहरातील शासकीय गोडावूनमध्ये निवडणूक निकाल जाहीर करण्यात आले. यावेळी सकाळी १० पासून दुपारी २ वाजेपर्यंत तालुक्यातील साठ ग्रामपंचायतींच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठी गर्दी बाबा चौक कालठण रोड येथे केली होती. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. _____________

टॅग्स :IndapurइंदापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलElectionनिवडणूकgram panchayatग्राम पंचायत