दहा लाखांच्या बनावट नोटा देऊन ठगविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:17 IST2018-10-25T01:17:04+5:302018-10-25T01:17:08+5:30

शंभर रुपयांच्या सुट्या नोटा देण्याचे आमिष दाखवून खोट्या नोटा देऊन सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे.

Fifty million fake currency notes | दहा लाखांच्या बनावट नोटा देऊन ठगविले

दहा लाखांच्या बनावट नोटा देऊन ठगविले

आळेफाटा : शंभर रुपयांच्या सुट्या नोटा देण्याचे आमिष दाखवून खोट्या नोटा देऊन सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध फिर्याद दाखल झाली आहे.
आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : संतोष नामदेव मोरे (रा. पाबळ, ता. शिरूर) यांनी याबाबत फिर्याद दिली असून त्यांना निवडणुकीकरिता शंभर रुपयांच्या सुट्या नोटा देण्याच्या बदल्यात दिलेल्या रकमेच्या वीस टक्के ज्यादा रक्कम देण्याचे आमिष काही व्यक्तींनी दाखवले. त्यानुसार मोरे यांनी दहा लाख रक्कम आळेफाटा बसस्थानकात सोमवारी सायंकाळी सहा वाजल्यानंतर संबंधितांना दिली. त्याबदल्यात त्यांना एका बॅगमध्ये सुट्या नोटा असल्याचे सांगितले. काही वेळातच मोरे यांनी बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये दोनशे रुपयांच्या खोट्या नोटांचे दहा ते बारा बंडल दिसले. वर नोटा आणि खाली कोरे कागद असे हे बंडल होते. दरम्यान, त्यांनी आळेफाटा पोलीस ठाणे गाठत फसवणूक झाल्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने बसस्थानक गाठत काही जणांना ताब्यात घेतले. यानंतर यामध्ये सहभागी असलेल्या इतरांची नावे पुढे आली. एकूण दहा जणांना याप्रकरणी ताब्यात घेत मंगळवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक गणेश उगले, सहायक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे तपास करत आहेत.

Web Title: Fifty million fake currency notes