शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पुणे शहराचा पाणीसाठा पंधरा टिएमसी करा ; महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 12:35 IST

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यावरुन पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्यात सातत्याने वाद सुरू आहेत.

ठळक मुद्देयाप्रकरणी महाराष्ट्र राज्य जलसंपदा नियमक प्राधिकरणासमोर आज सुनावणीमहापालिका जादा पाणी उचलते असा पाटबंधारे विभागाचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले शहराचे पाणी कमी न करण्याचे स्पष्ट निर्देश

पुणे : गेल्या काही वर्षांत पुणे शहराच्या लोकसंख्येत प्रचंड झपाट्याने वाढ होत असून, शहरासाठी निश्चित केलेला साडे आठ टिएमसीच्या पाणी साठ्यात वाढ करून तो पंधरा टिएमसी करावा, अशी मागणी महापालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य जलसंपदा नियमक प्राधिकरणाकडे सोमवारी (दि.१२नोव्हें) सुनावणी होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या पाणी पुरवठ्यावरुन पाटबंधारे विभाग आणि महापालिका यांच्यात सातत्याने वाद सुरू आहेत. महापालिका जादा पाणी उचलते असा पाटबंधारे विभागाचा आरोप आहे. तर महापालिकेकडून सातत्याने या आरोपांचे खंडन केले जात आहे. त्यातच आॅक्टोंबर महिन्यात झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत शहराच्या पाण्याला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर झाला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहराचे पाणी कमी करु नका असे स्पष्ट निर्देश जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना दिले.शासनाने सन २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे महापालिकेला वर्षाला साडे आठ टिएमसी पाण्याचा कोटा मंजुर केला आहे. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये शहराची लोकसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत असून, सध्या लोकसंख्येने ५० लाखांचा आकडा पार केला आहे. त्यानुसार शहरासाठी दिवसाला १२५० एमएलडीप्रमाणे वर्षांसाठी किमान १५ टिएमसी इतके पाणी मिळावे अशी महापालिकेची मागणी आहे. त्यासाठी महापालिकेने महाराष्ट्र राज्य जलसंपत्ती प्राधिकरणाकडे अपिल केले आहे. त्यावर सोमवारी मुंबईत सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शहराची वाढलेली लोकसंख्या, दोन्ही कॅन्टोमेन्ट, नव्याने समाविष्ट झालेली गावे व त्यांची लोकसंख्या, त्याचबरोबर शहरातील मोठ्या शैक्षणिक संख्या व त्यासाठी लागणारे पाणी अशी सविस्तर माहितीच पालिकेकडून प्राधिकरणापुढे सादर केली जाणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले.   दरम्यान सोमवारी होणारी ही पहिलीच सुनावणी असून त्यात लगेचच त्यावर निर्णय होऊ शकणार नाही असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणी