शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' बारा अधिकाऱ्यांची पदोन्नतीसाठी पुन्हा '' फिल्डींग ''

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2019 14:01 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पदावनती केलेल्या बारा अधिकाऱ्यांना पुन्हा पदोन्नती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत

ठळक मुद्दे तुकाराम मुंढे यांनी कायदेशीर बाबी तपासूनच त्यांची पदोन्नती केली रद्द

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी) चे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पदावनती केलेल्या बारा अधिकाऱ्यांना पुन्हा पदोन्नती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे विनंती अर्ज केले आहेत. त्यानुसार प्रशासनाकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.पीएमपीची २००७ मध्ये स्थापना झाल्यानंतर बारा अधिकाऱ्यांना सहा महिन्यांसाठी तात्पुरती पदोन्नती देण्यात आली होती. प्रशासकीय गरज म्हणून त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला होता. ही मुदत संपल्यानंतर संचालक मंडळाने संबंधित अधिकाऱ्यांना त्याच पदावर कायम केले. तत्कालीन अध्यक्ष आर. एन. जोशी यांनी या नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे त्यावेळी नमुद केले होते. त्यानंतर राष्ट्रवादी कामगार युनियननेही या नियुक्त्या रद्द करण्याची सातत्याने मागणी केली. प्रत्येकवेळी नव्याने आलेल्या अध्यक्षांकडे युनियनकडून पाठपुरावा करण्यात आला. मुंढे यांनी यांनी याबाबतचे संचालक मंडळाचे निर्णय व प्रशासकीय नियमांची तपासणी करून सर्व बारा अधिकाऱ्यांची पदावनती करण्याचा निर्णय घेतला. मुंढे यांनी २०१७ मध्ये या अधिकाऱ्यांना महामंडळ स्थापन होण्यापुर्वी असलेल्या पदांऐवजी दुसऱ्या पदांवर नियुक्ती केली. मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांचे काही निर्णय बदलण्यात आले. आता पदावनतीचा हा निर्णयही बदलण्याबाबत प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्याचे समजते. मुंढे यांच्या बदलीला एक वर्ष पुर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे पुन्हा पूर्वीचे पद मिळण्यासाठी काही दिवसांपुर्वी विनंती अर्ज केले आहेत. २००८ मध्ये संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या पदावरच पदोन्नती मिळावी, अशी मागणी या अधिकाऱ्यांनी केली आहे. पीएमपीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडून अहवाल मागविला आहे. या अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीवर निर्णय होणार आहे. त्यामुळे संबंधितांनी वरिष्ठांकडे फिल्डींग लावली असल्याची चर्चा पीएमपी वर्तुळात आहे. -------------------------... तर आंदोलन करू संबंधित अधिकाऱ्यांनी पदोन्नतीसाठी अर्ज केले आहेत. तुकाराम मुंढे यांनी कायदेशीर बाबी तपासूनच त्यांची पदोन्नती रद्द केली आहे. युनियनने त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. आता पुन्हा त्यांना पदोन्नतीसाठी हालचाली सुरू आहेत. त्यांना पदोन्नती मिळाल्यास युनियनकडून पुन्हा आंदोलन केले जाईल.- सुनिल नलावडे, सरचिटणीसराष्ट्रवादी कामगार युनियन

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएलtukaram mundheतुकाराम मुंढेNayana Gundeनयना गुंडे