शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याचे पाणी घेताना शेततळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:13 IST

बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील घटना बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील घटना बारामती : बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे ...

बारामती तालुक्यातील अंजनगाव

येथील घटना

बारामती तालुक्यातील अंजनगाव

येथील घटना

बारामती : बारामती तालुक्यातील अंजनगाव येथे पिण्याचे पाणी घेण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा बुुडून मृत्यू झाला. सुरुवातीला पाण्यात पडलेल्या मुलीला वाचविण्याचा प्रयत्न करणारी आई आणि दुसरी मुलगी देखील पाय घसरून पाण्यात पडली. यामध्ये मायलेकींचा मृत्यू झाला. मात्र, दुसरी मुलगी सुदैवाने बचावली आहे.

या घटनेत आईसह पाण्यात पडलेल्या तिघींपैकी बचावलेल्या मुलीमुळे हा दुर्दैवी प्रकार उघडकीस आला. अश्विनी सुरेश लावंड, समृद्धी सुरेश लावंड (वय १५) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मायलेकींची नावे आहेत. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विनी या आपल्या दोन मुलींसह शेतात बकऱ्या चारण्यासाठी जातात. मंगळवारी, (दि. १४) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शेततळ्यातून बाटलीच्या मदतीने पिण्यासाठी पाणी काढायला समृद्धी शेततळ्याच्या बाजूला गेली होती. त्या वेळी शेततळ्यात वापरलेल्या प्लास्टिक कागदावरून पाय घसरल्याने ती पाण्यात पडली. या वेळी मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात अश्विनी यांचा देखील पाय घसरला. दरम्यान, दोघींना वाचविण्याचा प्रयत्न करणारी दुसरी मुलगी श्रावणी देखील पाण्यात पडली. तिघी पाण्यात बुडाल्या, मात्र श्रावणी शेततळ्याच्या प्लास्टिक कागदाला धरून बाहेर पडली. तिने आरडाओरडा केल्याने हा प्रकार स्थानिक लोकांच्या लक्षात आला. दुर्दैवाने ग्रामस्थ जमा होण्यापूर्वीच अश्विनी आणि समृद्धी या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

घटनेची माहीती मिळताच बारामती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. उद्योजक सुरेश परकाळे यांच्या पुढाकाराने साडेआठ वाजण्याच्या सुमारास बारामती येथील आयर्नमॅन सतीश ननवरे, सुभाष बर्गे, महादेव तावरे यांच्या यांच्या टीमला पाचारण करण्यात आले. सुभाष परकाळे,उपसरपंच सुभाष वायसे या टीमच्या मदतीने युवकांच्या मदतीने बुडालेल्या मायलेकींचा शोध घेऊन मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यासाठी टीमने महत्वाची भूमिका बजावली. रात्री उशिरापर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी बारामतीच्या सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

फोटो ओळी :अश्विनी लावंड , समृद्धी लावंड

१५०९२०२१-बारामती-०१

————————————————