शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Save Trees: पुण्याच्या पेठांमध्ये झाडांचे प्रमाण कमी; उपनगरात सर्वाधिक, जाणून घ्या झाडांची आकडेवारी

By राजू हिंगे | Updated: August 1, 2024 16:45 IST

शहरात सर्वाधिक हिरवळीचा भाग सहकारनगर, धनकवडी असून, सर्वाधिक कमी वृक्षसंख्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आहे

पुणे : शहरात तब्बल ५५ लाख ८१ हजार ५७८ वृक्ष आहेत. त्यापैकी सर्वाधिक झाडे धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ११ लाख ९५ हजार ८९४ झाडे आहेत. सर्वात कमी म्हणजे १२ हजार ३४६ झाडे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आहेत. भवानीपेठ हा भाग जुन्या पुण्याचा असल्यामुळे तेथे वाडे-वस्त्यांचा भाग आहे. त्यामुळे तेथे वृक्षसंख्या कमी दिसते. शहरात वृक्षांच्या एकूण ४३० प्रजाती आढळल्या असून दुर्मीळ वृक्षांची संख्या १२४ नोंदवण्यात आली आहे. त्यात जुन्या वृक्षांची (हेरिटेज ट्री) संख्या २,८३८ आहे. पुणे महापालिकेच्या पर्यावरण अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टिम (जीआयएस) आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) चा वापर करून प्रत्येक वृक्षाची माहिती, भौगोलिक स्थान, अक्षांश आणि रेखांश, प्रजाती, स्थानिक आणि शास्त्रीय नाव, व्यास, उंची, सद्यस्थिती याबाबत महापालिकेकडून सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार शहरात ५५ लाख ८१ हजार ५७८ झाडे असल्याची नोंद झाली आहे. ही नाेंद १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत करण्यात आली असून, शहरात वृक्षांच्या एकूण ४३० प्रजाती आढळल्या आहेत. त्यात ७५ फॅमिलिज दिसतात. यात सर्वाधिक संख्या गिरीपुष्प या वृक्षांची आहे. याशिवाय दुर्मीळ वृक्षांची संख्या १२४ नोंदवण्यात आली असून, त्यात जुन्या वृक्षांची (हेरिटेज ट्री) संख्या २८३८ आहे.

साहजिकच वड हा सर्वात मोठे खोड असलेला वृक्ष म्हणून नोंदवला गेला आहे. शहरात सर्वाधिक हिरवळीचा भाग सहकारनगर, धनकवडी असून, सर्वाधिक कमी वृक्षसंख्या भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत आहे. भवानीपेठ हा भाग जुन्या पुण्याचा असल्यामुळे तेथे वाडे-वस्त्यांचा भाग आहे. त्यामुळे तेथे वृक्षसंख्या कमी दिसते. याशिवाय हडपसर, कोथरूड, नगररस्ता, शिवाजीनगर, औंध बाणेर या भागातील वृक्षसंख्या चार लाखांच्या पुढे आहे.

सन १९९५-९६ मध्ये पुण्यातील वृक्षसंख्या २८ लाख होती. २००७-०८ मध्ये ती ३६ लाख झाली आणि आताच्या गणनेनुसार ती ५५ लाखांच्या पुढे गेली आहे. देशी झाडे लावावीत, अशी जागृती केली जात आहे. २५ वर्षांपूर्वी वृक्ष संख्या कमी असल्याने वेगाने वाढणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. अनेक बांधकाम व्यावसायिकांनीही हेच वृक्ष लावले. यामुळे आपल्याकडील पर्यावरणाला हानी होत असल्याचे लक्षात आल्याने त्याविरोधात जागृती झाली. त्यामुळे महापालिकेने देशी वृक्षांची यादी जाहीर करून वृक्ष वाटिकांमध्येही भारतीय प्रजातींची रोपे विक्रीसाठी ठेवली आहेत.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय वृक्षांची संख्या

धनकवडी-सहकारनगर – ११ लाख ९५ हजार ८९४हडपसर मुंढवा – ४ लाख ९९ हजार ७५७

कोथरूड बावधन – ४ लाख ८८ हजार ९६५नगर रोड-वडगाव शेरी – ४ लाख ८६ हजार ०२५

शिवाजीनगर घोलेरोड – ४ लाख ७६ हजार ५४६औंध बाणेर – ४ लाख ५८ हजार ६९५

ढोले पाटील रोड – २ लाख ८५ हजार ४६९येरवडा कळस धानोरी – २ लाख ५६ हजार ४३०

कोंढवा येवलेवाडी – २ लाख २७ हजार २४८वानवडी रामटेकडी – १ लाख ९७ हजार ४५९

वारजे कर्वेनगर – १ लाख ८९ हजार २४१सिंहगड रस्ता – १ लाख ६४ हजार ०४५

बिबवेवाडी – १ लाख २९ लाख ८५६कसबा विश्रामबाग – ३५ हजार ४२६

भवानी पेठ – १२ हजार ३४६

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषणSocialसामाजिक