खते, बियाणांची दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:11 IST2021-05-19T04:11:13+5:302021-05-19T04:11:13+5:30

पुणे : माॅन्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असून, ग्रामीण भागात माॅन्सूनपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. परंतु सध्या जिल्ह्यातील ...

Fertilizer and seed shops will remain open till 2 pm | खते, बियाणांची दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार

खते, बियाणांची दुकाने दुपारी २ पर्यंत सुरू राहणार

पुणे : माॅन्सूनचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असून, ग्रामीण भागात माॅन्सूनपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. परंतु सध्या जिल्ह्यातील लाॅकडाऊन व वेळेच्या मर्यादेमुळे शेतक-यांची प्रचंड अडचण होत आहे. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून बुधवारपासून (दि.१९) शहर आणि जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्र, खते, बि-बायाणे व कीटकनाशके,औषधांची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान हाॅटस्पाॅट गावांतील दुकानाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे सुरू आहेत. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाल्याने शेतक-यांनी पेरणी पूर्व तयारीची कामे देखील सुरू केली आहेत. शेतकऱ्यांना बी-बियाणे आणि रासायनिक खते देण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा, यासाठी ग्रामीण भागातील खते बी-बियाणे आणि कीटकनाशकांची दुकाने आता दुपारी दोन वाजेपर्यंत उघडी राहतील. सध्या दुकाने उघडी ठेवण्याची वेळ सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना पेरणी पूर्वतयारीसाठी बी बियाण्यांची खरेदी तसेच रासायनिक खतांचा पुरवठा तसेच खरेदी यासाठी ही वेळ वाढवली आहे.

---------

शेतक-यांची अडचण दूर होईल

सध्या संपूर्ण जिल्ह्यात खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. परंतु लाॅकडाऊन व दुकानांच्या वेळेमुळे शेतक-यांना आवश्यक बी-बियाणे व खते मिळण्यास प्रचंड अडचण निर्माण होत होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे शेतक-यांना वेळेत बि-बियाणे व खते उपलब्ध होतील.

- बाबूराव वायकर, कृषी सभापती, जिल्हा परिषद

Web Title: Fertilizer and seed shops will remain open till 2 pm