मेथी, कोथिंबिरीने शेतकरी मालामाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 22:58 IST2019-03-30T22:58:24+5:302019-03-30T22:58:40+5:30
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना भाज्या व टोमॅटो फेकून द्यावे लागले होते. यातून धडा घेत शेतकऱ्यांनी भाज्या पिकविण्याचे प्रमाण कमी केले होते

मेथी, कोथिंबिरीने शेतकरी मालामाल
दावडी : खरपुडी येथील शेतकऱ्याने आठ गुंठे क्षेत्रात मेथीच्या पिकाचे घेतले ५० हजार रुपये मेथीच्या एका गड्डीला अठरा ते वीस रुपये बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना भाज्या व टोमॅटो फेकून द्यावे लागले होते. यातून धडा घेत शेतकऱ्यांनी भाज्या पिकविण्याचे प्रमाण कमी केले होते. तालुक्यात काही ठिकाणी पाणीटंचाई, तर काही ठिकाणी पाण्याची भरपूर उपलब्धता असल्यामुळे शेतकºयांनी मेथी व कोथिंबिरीचे पीक घेतले आहे. त्यामुळे सर्वच भाज्यांच्या भावात अचानक तेजी आली असल्याचे चित्र दिसत आहेत. दावडी परिसरातील खरपुडी निमगाव मांजरेवाडी होलेवाडी रेटवडी या परिसरातून चासकमानचा डावा कालवा जातो. दुसºया बाजूने भीमा नदीवर जागोजागी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे असल्यामुळे या परिसरात सहजासहजी पाणीटंचाई निर्माण होत नाही. येथील शेतकरी रब्बीतील पिके घेतल्यानंतर पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी बाजरी, मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर, कोबी तरकारी पिके घेतात. शेतकºयांनी मेथी व कोथिंबीर या पिकाचे उत्पादन घेतले आहे. हे पीक २५ दिवसांत तयार झाले. त्यांना पन्नास हजार रुपयांचा खर्च होऊन फायदा झाला. वेळोवेळी औषध फवारणी, खतटाकणी, पिकाची काळजी घेतली, असे शेतकरी प्रकाश काशीद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.