वाहनाच्या धडकेने बिबट मादी जखमी; ओतूरजवळील कोळमाथा येथील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 13:39 IST2018-01-30T13:36:55+5:302018-01-30T13:39:41+5:30
नगर-कल्याण महामार्गावरील ओतूरजवळील कोळमाथा येथे रविवारी रात्री ८ वाजता बिबट मादीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ती जबर जखमी झाली, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. रघतवान यांनी दिली.

वाहनाच्या धडकेने बिबट मादी जखमी; ओतूरजवळील कोळमाथा येथील प्रकार
ओतूर : नगर-कल्याण महामार्गावरील ओतूरजवळील कोळमाथा येथे रविवारी रात्री ८ वाजता बिबट मादीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने ती जबर जखमी झाली, अशी माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. रघतवान यांनी दिली.
रात्री आठ वाजता ओतूरचे वनरक्षक व्ही. आर. अडागळे यांना कोळमाथ्यावर एका वाहनाने बिबट्याला धडक बसली आहे. बिबट्या जखमी अवस्थेत आहे, असा दूरध्वनीवरून संदेश मिळाला. ओतूर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी वनरक्षक आर. डी. गवांदे, एस. जी. मोमीन, ए. डी. राऊत व जुन्नर वनपरिक्षेत्रातील कर्मचारी व एस. एस. रघतवान, माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख घटनास्थळी आले.
डॉ. देशमुख यांनी बिबट्याचे निरीक्षण केले. ते म्हणाले, ही बिबट मादी आहे. हिचे वय सुमारे पाच वर्षे असावे.