शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राजगुरुनगर जवळील चांडोली येथे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 15:16 IST

खेड तालुक्यातील चांडोली येथील नर्मदा सोसायटीमध्ये स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनवजात अर्भकाचे मृत्यूचे कारण अस्पष्ट

राजुगुरुनगर (दावडी) : खेड तालुक्यातील चांडोली येथील नर्मदा सोसायटीमध्ये शौचालय टाकीच्या चेंबरवर स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोमवारी ( दि. २४ जून) सकाळी १० घटना उघडकीस आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगुरुनगर शहरालगत चांडोली हे गाव आहे. तिथे नर्मदा सोसायटी आहे. सोमवारी सकाळी १० वाजता राखी युवराज चौधरी (रा. चांडोली ता. खेड ) यांना संडासच्या टाकीच्या चेंबरवर अंगावर कपडे नसलेल्या अवस्थेत लहान बालकाचे अर्भक दिसून आले. त्यांनी आजूबाजूचा नागरिकव खेड पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली.खेड पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमरदीप वंजारी व गणेश गवारे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन स्त्री जातीच्या अर्भकाला चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र ,डॉक्टरांनी अर्भक मृत असल्याचे घोषित केले. हे नवजात बालक आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास जन्मलेले असुन त्यांच्या पोटावर छातीवर पायावर ओरखडल्याच्या खरचटल्याच्या खुणा दिसत आहे. नवजात अर्भकाचे शवविच्छेदन झाल्यानंतर हे  मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे चांडोली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी गीता कुलकर्णी यांनी सांगितले. त्याचा व्हिसेरा ससून रुग्णालय पुणे येथे पाठवण्यात येणार आहे. स्त्री जातीचे अर्भक मृत अवस्थेत सापडल्यामुळे त्यामुळे स्थानिक नागरीकांत संताप व्यक्त केला आहे. खेड पोलिसांनी मृत अर्भक ताब्यात घेतले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :KhedखेडDeathमृत्यूPoliceपोलिस